केतन अग्रवाल प्रकरणात तो भाग महत्वाचा ठरणार; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होताच उज्वल निकम

Ujjwal Nikam On Ketan Agrawal Pune Lohagad Case: पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल याच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात (Ketan Agrawal Pune Lohagad Case) केतन अग्रवालचे (Ketan Agrawal) वडील विशाल अग्रवाल यांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशाल अग्रवाल दिले. (Ujjwal Nikam On Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील विशाल अग्रवाल यांनी केली. ही मागणी देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ मान्य करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिली. यानंतर उज्वल निकम यांची सदर प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हे आव्हानात्मक प्रकरण आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे अग्रवाल कुटुंबियांची मागणी सांगितली, पोलिसांचा तपास हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. लॉजिकल एंडला हे प्रकरण घेऊन जाणे गरजेचे आहे, असं उज्वल निकम म्हणाले. (Ujjwal Nikam On Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.

नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी:

Ketan Agarwal Death Case : केतनचं स्थळ येताच सियाने सोशल मिडीयावर स्टॉक केलं; सगळे व्हिडीओ पाहिले अन्… वडिलांनी सांगितला तो किस्सा

Comments are closed.