क्रिकेटचे मैदान, भावाची मैत्री अन् 2004 कॉल्स; सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? मोठी मा

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: लोहगड किल्ल्याच्या खोल दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तांत्रिक तपासामध्ये आणि गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांच्या प्रेमसंबंधांची (Love Affair) सुरुवात नेमकी कशी झाली, याचा खुलासा झाला आहे. दरम्यान, काल पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल (Sahil) याची तब्बल 10 तास कसून चौकशी केली असून, या चौकशीतून अनेक खुलासे समोर येत आहेत.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case:  क्रिकेटच्या मैदानावर झाली पहिली भेट

सिया आणि चेतन चौधरी यांची पहिली ओळख कोणत्याही सोशल मीडिया किंवा कॉलेजमध्ये झाली नव्हती, तर ती एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. साहिलचे सामने पाहण्यासाठी आणि स्वतः खेळण्यासाठी सिया नेहमी भावासोबत जात असे. याच मैदानावर सिया आणि चेतनची पहिली भेट झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले. या पार्टीनंतर त्यांच्यात नियमित भेटीगाठी वाढू लागल्या. क्रिकेटच्या मैदानावर झालेली ही साधी ओळख पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात बदलली.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case:  2004 फोन कॉल्स अन् 238 तासांचा संवाद

पोलिसांनी आरोपींचे सीडीआर तपासले असता, सिया आणि चेतन यांच्यातील संबंधांची माहिती समोर आली. मागील काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004  वेळा फोनवर संपर्क झाला होता. या दोघांनी मिळून सुमारे 238 तास संवाद साधला होता. केतनसोबत लग्न ठरलेलं असतानाही सिया आणि चेतन तासनतास एकमेकांच्या संपर्कात होते आणि याच संवादादरम्यान केतनला रस्त्यातून हटवण्याचा म्हणजेच त्याच्या हत्येचा कट रचला गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case:  साहिलची तब्बल 10 तास चौकशी

दरम्यान, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलण्यात आले, तेव्हा सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये एक संशयास्पद तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क (Mask) घालून फिरताना दिसला होता. तो तरुण दुसरा कोणी नसून चेतन चौधरी होता, ज्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा फोन दुकानात कामगाराकडे ठेवला होता. चेतन हा सियाचा भाऊ साहिलचा जवळचा मित्र असल्याने, या संपूर्ण कटाची माहिती साहिलला आधीपासून होती का? किंवा त्याने नकळत या दोघांना मदत केली का? याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी काल साहिलला ताब्यात घेऊन तब्बल 10 तास चौकशी केली.

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरणः एकमेकंवर आरोप

दरम्यान, पोलीस कोठडीत (Police Custody) असलेले दोन्ही आरोपी सिया आणि चेतन आता स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेकांवर हत्येच्या कटाचा दोषारोप करत आहेत. “मला सियासोबत पळून जायचे होते, पण केतनचा काटा काढण्याचा आग्रह सियानेच धरला,” असा दावा चेतनने केला आहे. तर दुसरीकडे, “केतनच्या हत्येची मूळ कल्पना चेतनचीच होती,” असा प्रतिदावा सियाने केला आहे. पोलीस या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करत असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सिया गोयलच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील नामांकित वकील उतरले मैदानात, केतन अग्रवाल प्रकरणात मोठी घडामोड

Comments are closed.