केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; सिया गोयलविरुद्ध ठोस पुरावेच नाहीत? बचाव पक्षाचा मोठा दाव
पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला (Ketan Agarwal Death Case) आता न्यायालयीन लढाईच्या पातळीवर एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिच्याविरुद्ध (Ketan Agarwal Death Case) पोलिसांकडे कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी (स्वतंत्र साक्षीदार) किंवा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा मोठा दावा बचाव पक्षाने केला असल्याची माहिती समोर आली आहे.(Ketan Agarwal Death Case)
Ketan Agarwal Death Case : “पोलिसांसमोर दिलेला जबाब न्यायालयात ग्राह्य धरता येत नाही”
आरोपी सिया गोयल हिचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी काल (शुक्रवारी, ता २६) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, सियाच्या विरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस स्वतंत्र साक्षीदार नाही. “सुरवातीला हा अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला गेला होता, मात्र नंतर पोलिसांनी हत्येच्या अँगलने तपास सुरू केला. भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम २३ नुसार, पोलिसांसमोर दिलेला कोणताही जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, जोपर्यंत तो मॅजिस्ट्रेटसमोर आणि पोलिसांच्या अनुपस्थितीत नोंदवला जात नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही.”
“कायद्यानुसार, पोलिसांसमोर नोंदवलेले कोणतेही जबाब किंवा कबुली जोपर्यंत दंडाधिकाऱ्यांसमोर (Magistrate) अधिकृतपणे नोंदवली जात नाही, तोपर्यंत ती न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही.” तसेच, सिया गोयल ही तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असून, २९ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळण्यावर मुख्य भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Ketan Agarwal Death Case : फडणवीसांची भेट; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती!
दुसरीकडे, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अग्रवाल कुटुंबाने मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणात वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. कुटुंबाच्या या विनंतीची दखल घेत, देशातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात ‘विशेष सरकारी वकील’ (Special Public Prosecutor) म्हणून काम पाहण्यास मान्यता दिली आहे.
Ketan Agarwal Death Case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासातील महत्त्वाचे अपडेट
– केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आज आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले आहे.
– रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
– याशिवाय, आरोपी सिया गोयलच्या दोन जवळच्या मैत्रिणींनाही तपासासाठी बोलावण्यात आले आहे.
– सिया गोयल या दोन्ही मैत्रिणींसोबत अनेक वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
– त्यामुळे या दोन्ही मैत्रिणींकडून तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
– हत्याप्रकरणातील कोणताही दुवा किंवा बाब दुर्लक्षित राहू नये, यासाठी पोलिस सर्व अंगांनी तपास करत आहेत. याच अनुषंगाने संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात ..
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.