टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टा

TET पेपर लीक TET परीक्षा कॅन्सल: संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.

टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं? (TET Peper Leak TET Exam Cancle)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेब‌द्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने काय म्हटलं? (TET Peper Leak TET Exam Cancle)

सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?- रोहिणी खडसे (TET Peper Leak TET Exam Cancle)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का ? जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार ? असं त्या म्हणाल्या आहेत. यासंदर्भात रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते? प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? असा सवालही त्यांनी केला आहे.‌

संबंधित बातमी:

मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी ‘टीईटी’ परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.