टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT…? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपू
महिला T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी भारत कसे पात्र ठरू शकते: आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC Women’s T20 World Cup 2026) मध्ये रविवारी भारतीय महिला संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याचा निकाल सेमीफायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील फेरीत आपले स्थान जवळपास पक्के केले आहे, तर भारताचा अंतिम चारमधील प्रवास थोडा कठीण दिसत आहे. विशेष म्हणजे, भारताच्या सेमीफायनलच्या आशा दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवरही अवलंबून असणार आहेत.
जर दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन्ही जिंकले तर… (India Women’s Semifinal Scenario)
जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला, पण त्यांचा नेट रन रेट (NRR) भारतापेक्षा सरस नसेल, तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हरवून थेट सेमीफायनल गाठू शकतो. पण जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवले आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला, तर मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पुढील फेरीत प्रवेश करतील आणि भारताचे आव्हान संपुष्टात येईल.
दक्षिण आफ्रिकेच्या NRR ला मोठी चालना मिळाली 📈
टॅझमिन ब्रिट्सकडून धमाकेदार 114* आणि तझमिन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांच्यातील शतकी भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर मोठा विजय मिळवला 🔥
उपांत्य फेरीच्या शर्यतीला आकार देणारा हा निकाल असू शकतो का? 👀
आयसीसी महिला… pic.twitter.com/OvpQh0wppG
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 26 जून 2026
ऑस्ट्रेलियाकडून हरूनही भारत कसा पोहोचू शकतो सेमीफायनलमध्ये? (How can India reach semi-finals despite losing to Australia?)
क्रिकेटमध्ये समीकरणे वेगाने बदलतात. एका विशिष्ट समीकरणानुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हरला तरीही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. रविवारीच दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातही सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालानंतरच भारतीय संघ मैदानात उतरेल. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला, तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरला तरीही अंतिम चारमध्ये पोहोचेल. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे आणि ते आपले सर्व सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम राहतील.
नेट रन रेट ठरणार गेम चेंजर
सध्या भारतीय संघाचा नेट रन रेट चांगला असल्याने संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश कडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मागेच राहील (किंवा बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर येईल). अशा स्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला, तरीही चांगल्या नेट रन रेटमुळे दुसऱ्या स्थानावर कायम राहू शकतो. याच मुख्य कारणामुळे ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जागा पक्की करू शकते.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे? (India vs Australia Women’s T20 World Cup 2026)
जरी गणिताचे समीकरण भारताच्या बाजूने असले, तरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणत्याही समीकरणावर अवलंबून न राहता, ऑस्ट्रेलियाला धूळ चारून थेट विजयासह सेमीफायनलचे तिकीट पक्के करण्याचा प्रयत्न करेल. रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सामना सुरू होईल, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) आणि जिओ हॉटस्टार (JioHotstar) वर लाईव्ह पाहता येईल.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.