पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महा
TET पेपर लीक TET परीक्षा कॅन्सल: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. तसेच टीईटीचा पेपर फुटल्यानंतर देशभरातून आता विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता MSCE, पुणे द्वारे आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे. (TET Peper Leak TET Exam Cancle)
ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी प्रकरणातील संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच संशयित तेथून पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहारा विमानतळ परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणले असून, त्यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (TET Peper Leak TET Exam Cancle)
पुन्हा टीईटीची परीक्षा कधी होणार? (When will the TET exam be held again?)
टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थी कडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असंही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं? (TET Peper Leak TET Exam Cancle)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
संबंधित बातमी:
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.