हुतात्म्यांच्या पुतळ्यांवरील 'सिंदूर'वरून वाद सुरू झाला आहे.

केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात शब्दयुद्ध, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी हाती घेतलेल्या ‘सिंदूर अभियाना’संदर्भात पुन्हा एकदा वाद भडकला आहे. या अभियानाच्या कालावधीत 6 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अशी माहिती केंद्र सरकारने दिली असून, या हुतात्मा सैनिकांची नावे शुक्रवारी घोषित करण्यात आली. तसेच हुतात्म्यांच्या स्मारकफलकावरही त्यांची नावे नोंदण्यात आली आहेत. मात्र, यामुळे विरोधकांनी सरकारवर माहिती लपविल्याचा आरोप केला आहे. तर केंद्र सरकारने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रतिपादन केले.

‘सिंदूर अभियान’ काळात एकाही भारतीय सैनिकाला हौतात्म्य प्राप्त झालेले नाही, असे प्रतिपादन भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले होते, असा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, आता सहा सैनिकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. याचाच अर्थ असा की संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशापासून माहिती लपविली असून देशाची दिशाभूल केली असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.

संरक्षण विभागाचे स्पष्टीकरण

राजनाथ सिंग यांच्या विधानाचा त्यावेळी काही युट्यूबर्सनी चुकीचा अर्थ लावून ते विधान प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. काही वृत्तमाध्यमांनी भारताचे काही युद्धविमानचालक हुतात्मा झाल्याचे प्रतिपादन केले होते. हे प्रतिपादन नाकारताना राजनाथसिंग यांनी भारताचा कोणताही विमानचालक हुतात्मा किंवा बेपत्ता झालेला नाही, असे स्पष्ट केले होते.

नावांची घोषणा

या अभियानाच्या काळात भारताचे सहा सैनिक हुतात्मा झाले होते. त्यांची नावे आता घोषित करण्यात आली आहेत. सुभेदार मेजर पवनकुमार, रायफलमन सुनिल कुमार, लान्स नायक दिनेश कुमार, अग्निवीर मुरली नाईक, हविलदार सुनिल कुमार सिंग आणि भारतीय वायुसेना सार्जंट सुरेंद्र कुमार अशी या हुतात्मा वीरांची नावे आहेत. आता त्यांची नावे सैनिक हुतात्मा स्मारकावर कोरण्यात आली आहेत.

कुटुंबियांना सुविधा देणार

हुतात्मा झालेल्या सर्व सैनिकांच्या कुटुंबियांना नियमानुसार सर्व सुविधा देण्यात येतील, अशी घोषणाही संरक्षण विभागाने केली आहे. हुतात्मा सैनिकाची पत्नी, अपत्ये, मातापिता आणि अशा सैनिकावर अवलंबून असणारे अन्य कुटुंबिय या साऱ्यांना प्रचलित नियमांच्या अनुसार वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर सुविधा पुरविण्यात येणार असून प्रक्रियेचा आरंभ झालेला आहे, असे स्पष्ट केले गेले आहे.

विरोधकांची तीव्र टीका

भारताचे सैनिक हुतात्मा झाल्याची माहिती त्याचवेळी देण्यात आली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी एकतर ती लपविलेले असू शकते, किंवा ती त्यावेळी त्यांच्याकडे नसल्याची शक्यता आहे. पण या दोन्ही शक्यतांपैकी कोणतीही खरी असली, तरी देशाचे संरक्षणमंत्री अकार्यक्षम आहेत, हे सिद्ध होते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला आहे. देशापासून माहिती लपवून सरकारने आपल्या अपयशावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला असून तो अयोग्य आहे, असे अनेक विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिपादन केले. तथापि, सरकारच्या प्रतिपादनानुसार विरोधक या संबंधात राजकारण करत असून कळ काढण्याचा त्यांचा विचार आहे.

गौरवाचा कालखंड

‘सिंदूर अभियान’ हा देशासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा कालखंड आहे. भारतीय सैनिक आणि सेनादलांनी पाकिस्तानला त्याच्या दु:साहसासाठी चांगलाच धडा शिकविला. पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी, सैनिक आणि दहशतवाद्यांचे प्रशिक्षक भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये ठार झाले. तसेच पाकिस्तानचे अनेक दहशतवादी तळ ध्वस्त करण्यात आले. त्याची विमाने आणि रडार यंत्रणाही नष्ट करण्यात आम्हाला यश आले. भारताच्या सर्व सैन्यदलांनी या अभियानात भाग घेऊन पाकिस्तानची कोंडी करत अतुलनीय पराक्रमाचे दर्शन घडविले आहे.

राजकारण न करण्याचे आवाहन

ड हुतात्मा सैनिकांच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप

ड केंद्र सरकारने या संदर्भात त्यावेळी माहिती लपविल्याचा विरोधी पक्षांचा दावा

ड राजनाथसिंग यांचे विधान त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केलेले

ड आता हुतात्मा सैनिकांच्या नावांची नोंद ‘सिंदूर अभियान’ स्मृती स्मारकावर

Comments are closed.