राम मंदिर ट्रस्टमध्ये बदल करण्याची तयारी सुरू आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार; 11 जुलै रोजी महत्त्वाची बैठक
वृत्तसंस्था/ अयोध्या
मंदिरातील देणगीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणानंतर आता श्री राम जन्मभूमी ट्रस्ट बरखास्त होण्याची जोरदार चर्चा आहे. देणगीचा अपहार आणि राजीनाम्यांच्या मालिकेनंतर प्रथमच 11 जुलै रोजी ट्रस्टची बैठक होणार आहे. या बैठकीत नृपेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत संकट आणि प्रशासकीय कोंडीमुळे संपूर्ण श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट बरखास्त केला जाऊ शकतो. मंदिरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि ज्येष्ठ सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 11 जुलैच्या बैठकीत नवीन ट्रस्टच्या स्थापनेला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. यापूर्वी राम मंदिराच्या दैनंदिन कामकाजाची आणि एकूण व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी सरचिटणीस चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर होती. अयोध्येत असताना ते संपूर्ण ट्रस्टचे व्यवस्थापन पाहत असत. मात्र, गैरव्यवहार प्रकरणात या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे ट्रस्टमध्ये एक मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, ट्रस्टचे आणखी एक महत्त्वाचे सदस्य, राजा विमलेंद्र मोहन मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले. तर, राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी महाराज हे बऱ्याच काळापासून आजारी असून सध्या बोलू शकत नाहीत. ट्रस्टचे इतर अनेक सदस्यही वयोवृद्ध असून पूर्वीप्रमाणे काम करण्यास असमर्थ असल्याने आता ट्रस्टवर नवे पदाधिकारी नियुक्त केले जाऊ शकतात.
नृपेंद्र मिश्रा होणार नवीन सीईओ?
राज्य सरकार आणि ट्रस्ट एका मोठ्या बदलाची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत नृपेंद्र मिश्रा यांची नव्याने स्थापन होणाऱ्या ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती केली जाऊ शकते. पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणून मिश्रा यांना असलेला प्रशासकीय अनुभव पाहता, मंदिराची संपूर्ण आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था पारदर्शकपणे सांभाळण्यासाठी त्यांना संपूर्ण सूत्रे दिली जाऊ शकतात.
देणगी चोरीप्रकरणी अनेक ठिकाणी छापे
राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणासंदर्भात अयोध्या पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आतापर्यंत काही जणांना अटक झाली असली तरी अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीनंतर, काही बँक कर्मचाऱ्यांसह आणखी काही नावे समोर आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रविवारी या प्रकरणात आणखी अटक करतील. या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून अनुकल्प मिश्राची भूमिका समोर येत असल्याचे वृत्त आहे.
चंपत राय मंदनार भूमिका
चंपत राय देणगी चोरीच्या वादासंदर्भात माध्यमांसमोर हजर होतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देतील असेही सांगितले जात आहे. तथापि, हे केवळ एसआयटीचा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच होईल. राम मंदिरातील देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर, चंपत राय यांच्यावरील आरोपांमुळे त्यांचे काही शिष्य व्यथित झाले आहेते. चंपत राय यांचे माजी शिष्य नरेश चौहान यांनी डोळ्यात अश्रू आणून देशातील कोणत्याही शंकराचार्यावर डाग असू शकतो, पण चंपत राय यांच्यावर नाही, असे म्हटले आहे.
Comments are closed.