ठाण्यात शाळेकडे मागितली १५ लाखांची खंडणी, दोन आरटीआय कार्यकर्त्यांवर झडप
इमारत अनधिकृत असल्याच्या खोट्या तक्रारी करून ठाणे शहरातील एका खासगी शाळेच्या व्यवस्थापनाकडून १५ लाख रुपयांची खंडणी घेताना दोन आरटीआय कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या खंडणीखोरांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र नंतर तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रुपये ठरवण्यात आली.
आरटीआय कार्यकर्ते राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा यांनी घोडबंदर रोड परिसरातील सेंट झेविअर्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक संस्थेची इमारत अनधिकृत असल्याचा आरोप करत पालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या दोघांनी तक्रारी मागे घेण्यासाठी संस्थेकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाही तर कारवाईची धमकीही दिली होती. शाळा व्यवस्थापनाने आरोपींशी चर्चा केल्यानंतर खंडणीची रक्कम १५ लाख रुपये ठरवण्ण्यात आली. ही खंडणीची रक्कम घेताना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकांनी दोघाही आरोपींवर झडप घातली.
Comments are closed.