लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची धक्कादायक कबुली, पोलीस चौकशीत काय काय
केतन अग्रवाल पुणे लोहगड प्रकरण: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला आहे. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल (27 जून) चौकशी केली. (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal ) आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) लोहगडावर आणून चौकशी करण्यात आली. केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील लोहगडावर पोलिसांनी आज सकाळी 9 वाजता क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं. केतन अग्रवालची हत्या कशी झाली याचा सीन रिक्रिएट करण्यात आला. सीन रिक्रिएटनसाठी आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावर आणण्यात आले होते. सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केतनला दरीत कसं डकलं, याचं सीन रिक्रिएट केला. दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत सियाने धक्कादायक कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, सियाची धक्कादायक कबुली- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, असं सियाने चौकशीत म्हटलं आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न मोडल्यास कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील, अशी सियाची भावना होती. त्यामुळे लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने चौकशीत सांगितल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. केतनशी लग्न करायचे नसल्याने सियाने प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून कट रचल्याचा दोघांवर आरोप आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून विविध पैलूंवर तपास सुरु आहे.
केतनचा लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात धाकदायक बाबी समोर आल्या आहेत. सिया आणि चेतनने गुगलवर खून करण्याचे पर्याय शोधले होते. लोहगडवरील कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलल्यास अपघात वाटेल? याचा देखील सिया आणि चेतनने विचार केला होता. केतनला विष देऊन ठार मारता येईल का? मारल्यानंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव कसा करायचा? दोघांनी गुगलवर माहिती शोधली. पोलिसांना काय सांगायचे, चौकशीदरम्यान कोणती भूमिका घ्यायची आणि संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी या दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सरावही केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाले आहे. केतनचा 18 जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला होता.
सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन करुन दाखवलं, VIDEO:
संबंधित बातमी:
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.