राजगडावर जाताना पाबे घाटात बस दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील अंधेरी येथील किल्ले राजगडावर निघालेली एक मिनी बस पाबे घाटात कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. घाटात एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

मुंबईतील अंधेरी येथील 20 जणांचा पर्यटकांचा गट राजगड किल्ल्यावर ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी रवाना झाला होता. पाबे घाटातून प्रवास करत असताना एका वळणावर चालकाचे मिनी बसवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्यालगतच्या दरीत कोसळले. या भीषण अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Comments are closed.