पोलिसांनी पकडल्यावर काय उत्तरं द्यायची?; गुन्ह्याआधीच सिया अन् चेतनने घेतली होती सोशल मीडियावरू
पुणे: सिया आणि चेतन… एका प्रेमसंबंधाचा शेवट अत्यंत क्रूर आणि भयानक गुन्ह्याने होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. घरच्यांच्या इच्छेखातर आणि दबावामुळे सियाचा विवाह व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Death Case) या तरुणाशी ठरला होता. मात्र, सियाला केतनसोबत संसार न करता तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबतच आयुष्य घालवायचे होते. घरातून पळून जाण्याचा सोपा मार्ग निवडण्याऐवजी, या दोघांनी थेट सियाचा होणारा पती केतनचाच (Ketan Agrawal Death Case) कायमचा काटा काढण्याचा एक थंड डोक्याने कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीतून आणि तांत्रिक तपासातून कसे सुटायचे, याचे प्रशिक्षण त्यांनी चक्क सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतले होते.(Ketan Agrawal Death Case)
Ketan Agrawal Death : ‘सापा’चा बहाणा करून रचला बचावाचा खोटा ड्रामा!
१९ जून रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने मोठ्या उत्साहात महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये तब्बल १७ खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, हा वाढदिवस येण्यापूर्वीच केतनला संपवण्याचा चंग या दोघांनी बांधला होता. १४ जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता; मात्र, तिचा जोर कमी पडल्याने केतन सुदैवाने वाचला. त्या वेळी केतनला संशय येऊ नये म्हणून, “तिथे अचानक साप दिसल्याने मी घाबरले आणि माझा तुला धक्का लागला,” अशी खोटी कहाणी सियाने रचली होती.
Ketan Agrawal Death : विष देण्याच्या पद्धती आणि दरीचा सराव; इंटरनेटवर केला होता शोध
पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सिया आणि चेतन अधिक सतर्क झाले. केतनला नेमके कसे आणि किल्ल्याच्या कोणत्या धोकादायक कड्यावरून ढकलायचे, याचा त्यांनी बऱ्याचदा सराव (रेकी) केला होता. इतकेच नव्हे तर, त्यांनी इंटरनेटवर एखाद्याला विष देऊन कसे मारता येऊ शकते, याच्या पद्धती शोधल्या होत्या; तसेच किल्ल्यावरील सर्वात धोकादायक स्पॉट्सची माहितीही गोळा केली होती. अखेर या संपूर्ण क्रूर नियोजनाची परिणती केतनच्या हत्येत झाली, ज्याचा उलगडा आता पोलिसांच्या तपासात झाला आहे.
Ketan Agrawal Death : बाली ट्रिप रद्द करण्यासाठी पासपोर्टही फाडला
६ जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जाणार होते. तिथे दोघांना एकाच खोलीत राहावे लागणार असल्याने सियाने त्यापूर्वीच हत्येचा कट रचला. मुंबई विमानतळावर जाताना खोपोली फूड मॉलजवळ गाडी थांबली असता, सियाने मोबाइल विसरल्याचा बहाणा करत गाडीत जाऊन केतनचा पासपोर्ट चोरला. वॉशरूममध्ये जाऊन तिने पासपोर्ट फाडून टॉयलेटमध्ये फ्लश केली. यामुळे केतनला बाली ट्रिप रद्द करावा लागला.
३१ मे रोजी कट रचण्यापासून ते पासपोर्ट फाडून बाली ट्रिप रद्द करण्यापर्यंत आणि शेवटी ८ जूनला थंड डोक्याने हत्या करण्यापर्यंतचे सर्व नियोजन या दोघांनी आधीच केले होते. हत्येपूर्वी त्यांनी केतनला कसे ढकलायचे, याचा सरावही केल्याचे उघड झाले आहे. एकूणच प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Ketan Agrawal Death : गडावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न फसला अन्…
पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, १४ जून रोजी सियाने केतनला लोहगडावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात ती अयशस्वी ठरली. त्यानंतर चेतनने स्वतः पुढाकार घेत ‘आता मीच येतो’ असे सियाला सांगितले. या बोलण्याचे भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
Ketan Agrawal Death : लग्न करण्यासाठी दोघेही थांबणार होते ३ वर्षे
केतनला संपवल्यानंतर लगेच लग्न केल्यास पोलिसांना संशय येईल, म्हणून या दोघांनी दोन ते तीन वर्षे थांबून मगच लग्न करण्याचे ठरवले होते. व्हॉट्सअॅपवरील कोणते मेसेज डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे, याची पूर्ण काळजी सिया आणि चेतनने यांनी आधीच घेतल्याचेही समोर आले
Ketan Agrawal Death : एवढा मोठा गुन्हा करूनही सियाला पश्चात्तापाचा लवलेशही नाही
गुन्हा घडल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड, मोबाइल लोकेशन आणि त्यांच्या भेटीच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती काढल्यावर या कटाचा उलगडा झाला आणि दोघांना अटक करण्यात आली. अटकेनंतरही आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा मोठा गुन्हा करूनही सियाला कोणताही पश्चात्ताप होत नाहीये, ती पोलिस कोठडीत रडलीही नसल्याची माहिती आहे.
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.