फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचायेत : शेट्टी
Raju Shetti on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही पंतप्रधान व्हा. आजवर एकही मराठी माणूस तिथपर्यंत पोहोचला नाही. तुम्ही झालात तर आम्हाला आनंदच आहे. तुमचे स्वागत करु, पण त्यासाठी तुम्ही चांगले काम करा ही लोकं डोक्यावर घेतील असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केले. पंतप्रधान व्हायला पैसे गोळा करायची गरज लागणार नाही असे शेट्टी म्हणाले. फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असून त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी रुपये गोळा केले जात असल्याचा आरोप केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. कोणत्याही परिस्थिती शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे असी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळं वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आमचे वाटोळे करुन तुम्ही पंतप्रधान झालेले बघायला आम्ही जिवंत तर असायला पाहिजे ना
आमचा बळी देऊन, आमचे वाटोळे करुन तुम्ही पंतप्रधान झालेले बघायला आम्ही जिवंत तर असायला पाहिजे ना देवेंद्र फडणवीस असेही शेट्टी म्हणाले. उद्धव ठाकरे एका बाजूने देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून घालविण्यासाठी ऑपरेशन टायगर चालवले जात असल्याचा आरोप केला होता. आता राजू शेट्टी यांनीही फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असून त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी रुपये गोळा केले जात असल्याचा आरोप केला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकम येथे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. या मेळाव्याला आमदार सतीश पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.
आषाढीला पांडुरंगाच्या पूजेला येताना आम्हाला शक्तीपिठाच्या कचाट्यातून मोकळे करा, तुमचे स्वागत करु
राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला टोकाचा विरोध केला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असून हा पैसा देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यासाठी गोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही आषाढीला पांडुरंगाच्या पूजेला येताना आम्हाला शक्तीपिठाच्या कचाट्यातून मोकळे केले अशी घोषणा करा आम्ही तुमच्या स्वागताला येऊ असे शेट्टी म्हणाले. मात्र असे न झाल्यास तुमचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करावे लागेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.