अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य
मंत्री कैलाश विजयवर्गीय: मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश वियजवर्गीय यांनी भोपाळ येथील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक सरकारी अधिकारी स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडू लागले आहेत. अनेक अधिकारी असं म्हणतात, की, मी सुद्धा आरएसएसची चड्डी घातली आहे असे मंत्री कैलाश वियजवर्गीय म्हणाले. या संघटनेचा विस्तार वेगाने होत असला, तरी आज त्यात ‘चांगल्या माणसांची’ कमतरता जाणवत आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश वियजवर्गीय यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. राज्यात अधिकारी आणि आरएसएस यांच्यातील संबंधांवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपलं संटन वाढत आहे. आपली विचारधारा वाढत असल्याचेही ते म्हणाले. आमचे सरकार आल्यापासून अधिकारी सांगत आहेत की आमचे वडील शाखेत जात होते, . पण आमचं सरकार येण्याच्या आधी कोणी सांगत नव्हते असे देखील मंत्री कैलाश वियजवर्गीय म्हणाले. आता वाढणाऱ्या गर्दीत चांगल्या माणसांची कमी आहे.
महाराष्ट्रात देखील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सकल हिंदू समाज संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) कौतुक केल्याचा व्हीडिओ गुरुवारी (26 जून) व्हायरल झाला होता. काँग्रेसनं त्यावर टीका करत व्हीडिओ शेअर केला. नांगरे पाटील यांच्या त्याच वक्तव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका केली. या प्रकरणावर विश्वास नांगरे पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नेमकं काय आहे प्रकरण?
विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या व्हिडिओमध्ये ते एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारी सेवेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारची भूमिका मांडणे योग्य नसल्याचे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, राज ठाकरेंची टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, “तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा थेट आणि जाहीर सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. सध्या राजकीय मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी ‘पुनर्वसन हमी योजना’ सुरूच आहे, त्यामुळे तुमचीही सोय होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.