Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्याय
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला सुनावणार आहे. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला फाशी मिळणार की जन्मठेप हे आज स्पष्ट होणार..साधारण सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल- गुरुवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालय युक्तीवाद पूर्ण झाला. न्यायालयाने हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे म्हणत भीमराव कांबळेला दोषी ठरवलं आहे. तर सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. भीमराव कांबळेवर ज्या ज्या कलमांखाली खटला चालला, ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये थेट ‘फाशीच्या शिक्षेची’ तरतूद आहे, एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आता आज अंतिम सुनावणीत न्यायालय काय शिक्षा सुनावणार हे पहाणं महत्वाचं असेल.
Comments are closed.