शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश, साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटीला विकला गेला; संजय राऊ
Sanjay Raut on Bhausaheb Wakchaure: शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटाची वाट धरल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन थेट मतदारांशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज शिर्डी येथील सिद्ध संकल्प कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्यावर घणाघाती टीका केलीय.
मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत कमालीचे आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “या गद्दार खासदाराचे काही करू नका, रस्त्यात दिसला की ‘ऑपरेशन तुडवा’ करा. शिर्डीमध्ये तरी दाऊदचे नाव घेऊ नका. येथील एका मुस्लिम मावळ्याने बोर्ड लावलाय की, शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार; ही केवळ त्याचीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. आपण सर्वजण साईबाबांच्या दरबारात आलो आहोत.”
Sanjay Raut on Bhausaheb Wakchaure: साईबाबांची शपथ घेतली आणि 100 कोटीला विकला गेला
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी केल्याने शिर्डी मतदारसंघात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून राऊतांनी वाकचौरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, “या ठिकाणचा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. त्याने एकदा गद्दारी केली होती, परत माफी मागत आला आणि खासदार झाला; पण आता पुन्हा 100 कोटीला विकला गेला. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी त्याला विचारले होते की, ‘भाऊसाहेब, तुमच्याबद्दल काहीतरी ऐकायला येतंय.’ त्यावर या माणसाने चक्क तीन वेळेस साईबाबांची शपथ घेतली होती. एक रुपया खर्च न करता भाऊसाहेब खासदार झाला, कारण निवडणुकीतील सर्व पैसे पक्षाने खर्च केले आणि प्रचार शिवसैनिकांनी केला. मात्र, हा माणूस 100 कोटीला विकला गेला, अशी टीका त्यांनी केली.
Sanjay Raut on Bhausaheb Wakchaure: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात तुफान
संजय राऊत यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक करत बंडखोरांना आव्हान दिले. “वाकचौरे सारखे लोक येतील आणि जातील, शिवसेना अशीच राहील. महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरे यांनी आता दौरा सुरू केला असून ते फिरायला लागल्यावर महाराष्ट्रात मोठे तुफान आले आहे. हे गद्दार आता या तुफानात वाहून जातील. वाकचौरेला सांगा, आता तुला लोकसभेचे तोंड दिसणार नाही,” अशा कडक शब्दांत राऊतांनी भाऊसाहेब वाकचौरेवर टीका केली.
आणखी वाचा
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.