Nasrapur Case Final Result : “तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या”; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्रदिनी(१ मे) रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या नराधम आरोपीने अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवलं होतं. या प्रकरणी (Nasrapur Case Verdict) पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज (२९जून) अंतिम फैसला सुनावला. ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली. न्यायालयाने हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे म्हणत भीमराव कांबळेला (Bhimrao Kamble) दोषी ठरवलं आहे. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. (Pune Nasrapur Case Result Marathi News) हा अंतिम फैसला सुनावत असतानाच विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करत आंतिम निर्णय दिला आहे, तर हे प्रकरण अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे, निकाल वाचन करत असलाना न्यायाधिशांनी आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता त्याची कल्पना होती की त्याला काही होणार नाही, म्हणून तो ही कृती करायला धजावला, असं नमूद केलं आहे.

Nasrapur Case Result: नसरापूर प्रकरणातील न्यायाधिशांनी निकाल वाचनावेळी कोणकोणते मुद्दे मांडले

विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी भीमराव कांबळेला फाशीच्या शिक्षेची मागणी करताना त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे १२ निकाल जोडले आहेत. हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेले आहेत आणि बऱ्याचश्या केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे. काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत रुपांतर केले आहे. आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. गुन्ह्यातील आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेले परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दखल घेण्यात आलेली आहे. पीडिता स्वतःच संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती? तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का? या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Nasrapur Case Final Verdict: क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी या प्रकरणाचा अंतिम निकाल वाचन करताना म्हटलं की, घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबत होता.  तो तिच्यासोबत का होता? याची समाधानकारक उत्तर देण्यात आरोपी अपयशी ठरला आहे. या प्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले आहे. आता हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडत का? हा प्रश्न आहे. कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवते आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केलं आहे. कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कट रचून हत्या करणे, बलात्कार या सगळ्याला फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. त्या घटनेने समाजावर दूरगामी परिणाम होणार असतील तर तसा आरोपी देखील फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे, असंही निकाल वाचताना न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

Nasrapur Case Final Verdict: आरोपीचा वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही

शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असतात. याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते. मुलीला टॉर्चर करण्यात आला आहे. मुलगी असहाय्य (helpless) होती. स्वतःची वासना (lust) पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केलं आहे. याने समाजाला धक्का बसला आहे. आरोपीचा वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता, त्याची कल्पना होती की, त्याला काही होणार नाही म्हणून तो ही कृती करायला धजावला नाही. निर्भया प्रकरणानंतर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत केले कृत्य केलेलं, हे कृत्य अतिशय निर्दयी होतं आणि त्यामुळे समाज मनावर गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती, त्यांनी मुंबई बंगळूर हायवे रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली एवढी ही गंभीर घटना आहे.

Nasrapur Case Final Verdict: पोस्टमार्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं

समाजामध्ये उमटलेल्या प्रक्रियेचा आम्ही आदर करतो, मात्र आम्हाला कायद्यानुसार चालायला हवं. अनेक प्रकरणामध्ये चुकीचा तपास होतो. कधी न्याय मिळण्यात होणारी दिरंगाई यामुळे समाजाच न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो. याप्रकरणी १६ दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टाचा पूर्ण वेळ या प्रकरणाला देण्यात आला होता. १६ दिवसात खटला पूर्ण करण्यात आला. यादरम्यान ५५ साक्षीदार तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणामध्ये झालं पाहिजे. मात्र ते एक स्वप्न असेल सगळ्या प्रकरणामध्ये ते शक्य नाही, असंही न्यायाधिशांनी निकाल वाचताना म्हटलं आहे. सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती, पोस्टमार्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे. सीसीटीव्ही (CCTV)मध्ये आरोपी चित्रित झाला आहे. त्याच कृत्य अमानुष आहे. हत्येनंतर देखील त्याने तिच्या लैंगिक अत्याचार केले. त्याने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही. तिच्यासोबत ओरल सेक्स करण्याचा प्रयत्न केला. त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे.

Nasrapur Case Final Verdict:  ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस

याआधी ५३ वर्षांचा असताना देखील आरोपीने आपल्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे. तसेच त्याने आणखीनही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही, असंही न्यायाधिशांनी निकालाचं वाचन करताना म्हटलं आहे. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे. ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. मुलीच्या अंगावरती १८ जखमा होत्या. तीची पॅंन्ट तिच्या तोंडात २१ सेंटिमर आत कोंबण्यात आली होती.  मुलीने या दरम्यान अनेक वेदना सहन केल्या. जे काही मुलीच्या कुटुंबीयांनी सहन केलं असेल, याची कोर्टाला जाणीव आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला, त्यासंदर्भात ते अभिमानासाठी पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. तपासातील सगळे अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे. याप्रकरणी डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट, फॉरेन्सिक तज्ञांनी देखील वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली आणि हे एक टीम वर्कच काम आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे असंही न्यायाधिशांनी यावेळी म्हटलं आहे. बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पॉक्सो प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय? (Pune Nasrapur Case Result)

महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला.  या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम (Pune Nasrapur Case Updates)

1 मे 2026 (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
2 मे 2026- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मे 2026 चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय, तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
16 मे 2026 – अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
28 मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून 2026 – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
20 जून 2026 च्या सुमारास- दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
25 जून 2026 – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.
29 जून 2026- आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली.

Comments are closed.