मोदींना आणखी एका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्जियन ऑफ ब्लू होरायझन’ या सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी मोदी यांना हा सन्मान दिला. पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना सेशेल्सने सन्मानित केले आहे. यानंतर मोदी यांनी सेशेल्सच्या संसदेतही भाषण केले. असे करणारे मोदी हे हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान आहेत. सेशेल्ससोबत हिंदुस्थानचे संबंध वर्ष 1770पासून आहेत. आमच्यासाठी सेशल्स केवळ एक द्विपसमूह नसून त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 34 देशांनी सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे.
Comments are closed.