‘गुगल सर्च’मुळे झाला मोठा भांडाफोड; नाशिक TCS प्रकरणात एसआयटीने सादर केला हादरवणारा पुरावा, कोर
नाशिक टीसीएस प्रकरण: नाशिक येथील टीसीएस (Nashik TCS Case) कंपनीतील अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात एक हादरवणारा पुरावा सादर केला आहे. संशयितांनी पीडितेचे सक्तीने धर्मांतर करून तिचे नाव ‘हानिया’ ठेवण्यासाठी तब्बल एक वर्षापूर्वी, म्हणजेच 5 एप्रिल 2025 रोजी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Nashik TCS Case: शैक्षणिक कागदपत्रे जप्त करून भरली ‘जकात’
संशयितांनी केवळ गुगल सर्च केला नाही, तर पीडितेची सर्व शैक्षणिक कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करून, तिच्या या बदललेल्या नवीन नावाने नऊ हजार रुपयांची ‘जकात’ देखील भरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एसआयटीने या सर्व बाबींचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
Nashik TCS Case: एमआयएम नगरसेवक आणि मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’चे कनेक्शन
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, एसआयटीच्या सखोल तपासात छत्रपती संभाजीनगरमधील ‘एमआयएम’चा (MIM) नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांना सहसंशयित करण्यात आले आहे. मतीन पटेलने संशयित निदा खानला लपण्यासाठी हानिफचे घर उपलब्ध करून दिले होते. विशेष म्हणजे, मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आशिफ शेख यांनी मुख्य संशयित दानिश शेख याला वकील आणि कायदेशीर मदत पुरवत जाहीर पाठिंबा दिला आहे.
Nashik TCS Case: निदा खान गर्भवती; न्यायालयाकडून वैद्यकीय तपासणीचे आदेश
नाशिकरोड न्यायालयात 22 जून रोजी झालेल्या खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीदरम्यान, संशयित निदा खानच्या वकिलांनी तिच्या वैद्यकीय तपासणीचा अर्ज सादर केला. निदा खान (Nida Khan) सध्या गर्भवती असून तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच तिला कारागृहात जड कामे करावी लागत असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत कारागृह प्रशासनाला निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत.
Nashik TCS Case: जामिनावर उद्या अंतिम निर्णय
सध्या मुख्य संशयित निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 19 जून रोजी सरकारी आणि विरोधी पक्षातर्फे तब्बल तीन तास जोरदार युक्तिवाद झाला होता. या प्रकरणात एसआयटीने तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. 25 जून रोजी यावर अंतिम आदेश होणार होता, मात्र न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे तो लांबणीवर पडला. आता मंगळवारी (30 जून) न्यायालय संशयितांना जामीन देणार की त्यांचा अर्ज फेटाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.