इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियावर मोठं दडपण; जाणून घ्या मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
भारतीय क्रिकेट संघासाठी एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे, मात्र ही सुरुवात फारशी समाधानकारक झालेली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी-20 मालिका गमवावी लागली आहे. आता संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, तिथे पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय (ODI) सामने खेळले जाणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 1 जुलै (बुधवार) रोजी सुरुवात होत आहे. दुसरा सामना शनिवार, 4 जुलै रोजी, तर तिसरा सामना मंगळवार, 7 जुलै रोजी होणार आहे. चौथा सामना गुरुवार, 9 जुलै रोजी आणि मालिकेतील पाचवा व अंतिम सामना 11 जुलै रोजी खेळला जाईल. यासह टी-20 क्रिकेटची सांगता होईल.
मात्र, भारतीय संघाचा हा दौरा इथेच संपणार नाही. यानंतर तीन सामन्यांची महत्त्वाची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना मंगळवार, 14 जुलै रोजी, तर दुसरा सामना गुरुवार, 16 जुलै रोजी होईल. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवार, 19 जुलै रोजी होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसतील, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये शुबमन गिल संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
भारताचा इंग्लड दाैरा 2026-
टी20 मालिका
पहिला टी20 सामना- 2 जुलै
दुसरा टी20 सामना- 4 जुलै
तिसरा टी20 सामना- 7 जुलै
चाैथा टी20 सामना – 9 जुलै
पाचवा टी20 सामना- 11 जुलै
वनडे मालिका
पहिला वनडे सामना- 14 जुलै
दुसरा वनडे सामना- 16 जुलै
तिसरा वनडे सामना- 19 जुलै
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्यासमोर एक मोठी आणि कठीण परीक्षा असणार आहे. श्रेयसच्या नेतृत्वाबाबत आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकचे विजेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर सूर्याकडून केवळ कर्णधारपदच काढून घेतले नाही, तर त्याला संघातूनही वगळण्यात आले. त्यानंतर श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण त्याच्या भविष्यातील संधी मोठ्या प्रमाणात या मालिकेच्या निकालावर अवलंबून असतील.
Comments are closed.