ठाण्यात दोन दिवसांत पाच प्राणघातक हल्ले, कायदा-सुव्यवस्था धाब्यावर ; पोलिसांचा धाक संपला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाण्यात गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच ठिकाणी प्राणघातक हल्ले झाल्याने खळबळ उडाली आहे. कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून किरकोळ वाद, जुन्या भांडणाचा राग आणि पैशांच्या कारणावरून झालेल्या हिंसक हल्ल्यांच्या वेगवेगळ्या घटनांनी मुंब्रा, कळवा आणि शिळफाटा हादरले आहे. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचा धाक संपला आहे का, असा सवाल सामान्य ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.

शिळफाटा येथील एका तरुणावर एका ओळखीच्या व्यक्तीने अचानक चाकूने हल्ला केला. मुंब्रा येथे तरुणाकडे नशेसाठी पैसे मागण्यात आले. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून वाहनाच्या लोखंडी चावीने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. अमृतनगर येथे चोर म्हणून चिडवल्याने दोन साथीदारांच्या मदतीने तरुणावर चाकूने वार करण्यात आले. कळवा येथे एका तरुणाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, कानावर आणि दोन्ही हातांवर सपासप वार करण्यात आले.

Comments are closed.