जयपूरमध्ये बांधकामाधीन इमारतीची भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानच्या जयपूरमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली चिरडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे बळींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बचावपथकांनी बचाव कार्य सुरू करत जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांसोबत एनडीआरएफ आणि एसडीआरआफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी संदेश नायक यांनी 3 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. जयपूरच्या या भागात नाल्यासाठी खोदकाम सुरू होते, यादरम्यान खूप खोलवर खोदले गेल्याने नजीकच्या निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे.

खोदकाम आणि इमारतीच्या बांधकामादरम्यान सुरक्षा मापदंडांचे पालन करण्यात आले होते की नाही याची पडताळणी आता प्रशासन करत आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी इन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी युक्त टीमला पाचारण करण्यात आले आहे.

 

Comments are closed.