ठाकरेंची साथ सोडली पण वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिरांचा शब्द, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

सचिन अहिरवर आदित्य ठाकरे : ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर फुटले (Sachin Ahir) आणि शिंदेंचं धक्कातंत्र पुन्हा एकदा यशस्वी झालं. शिंदेंचे फासे अगदी अचूक पडले आणि त्यामध्ये ठाकरे गट पूर्णपणे अडकला. आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) वरळीतला (Worli) विजय सोपा करणारे सचिन अहिर यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करुन थेट शिंदेसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. आधीच सहा खासदार फुटल्यामुळे खचलेला ठाकरे गट सावरत असतानाच सचिन अहिर यांना फोडून शिंदेंनी पुन्हा धक्का दिला. फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. अशातच शिंदेंच्या धक्कातंत्रावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेले काही दिवस आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, ही व्यक्ती अशी आहे जी आदित्य ठाकरे भेटतच नाहीत, असं बोलूच शकत नाही… परवा आम्ही पुण्याहून एकत्र आलोत. तरी प्रश्न हाच आहे की, अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबाडणार?, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यासोबत वरळीतल्या पुढच्या निवडणुकीत तुमच्या विरोधात सचिन अहिर उभे असतील, या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरेंनी काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. तसेच, सकाळी त्यांनी मला मेसेज केलाय की, वरळीत उभा नाही राहणार… पण या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

सचिन अहिर वेगळे झाल्यानंतर आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले? (सचिन अहिरवर आदित्य ठाकरे)

सचिन अहिर फुटल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेले काही दिवस आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात, हे आम्ही पाहत आलोय, यात काही नवीन नाही, यात धक्का बसण्यासारखं काहीच नाही… तसं असेल तर वरळी असेल, शिवडी वैगरे पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजुनही आहेत. जी मतं आपल्याला मिळत आलीत, सुरुवातीपासून आजपर्यंत ती मतं आम्हाला मिळत आलीत, तो बालेकिल्ला अजूनही आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं… म्हणून कोणी येण्यानं आणि कोणी जाण्यानं धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैव आहे की, ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, तेच जातायत. ही व्यक्ती अशी आहे जी आदित्य ठाकरे भेटतच नाहीत, असं बोलूच शकत नाही… परवा आम्ही पुण्याहून एकत्र आलोत. तरी प्रश्न हाच आहे की, अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबाडणार?”

“स्वतः आमदार आहेत, त्यांच्या मुलीला मी NGO च्या कोट्यातून प्रभाग समिती दिलीय. भावाला आम्ही बेस्टची समिती दिलीय, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेते पद आहे, बेस्ट यूनियन अध्यक्ष आहेत… एवढं सगळं असून अजून काय हवंय? हा एक प्रश्न पडतोच. आम्ही काय कमी दिलंय का? इतर बोंबलत असतात भेटत नाही, भेटत नाही… तसंही नाहीय. रोज तुमचे माझ्यासोबतचे फोटो आहेत, रोज येताजाता भेटता, मग अजून काय करायचं तुमच्यासाठी, रोज तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कुणी येण्यानं, कुणी जाण्यानं काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे, तो तसाच राहणार…”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “परवा पुण्याहून येताना आम्ही एकत्र होतो, तेव्हा चर्चा झाली काय-काय करायचं… माझा सगळ्या जाणाऱ्यांना हाच प्रश्न आहे की, जे खासदार गेलेत किंवा आज सचिनभाऊ गेलेत, जे आपली मंदिरं लुटतायत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केलाय, उज्जैन जमीन घोटाळा ज्यांनी केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छितात, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसणार? तिसरी गोष्ट म्हणजे, आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर समजलंय, हे ऑफरेशन टायगर मुळीच नाही, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे…”

वरळीत काही फरक पडत नाही, असले नसले तरी… : आदित्य ठाकरे

येत्या विधानसभा निवडणुकीत वरळीमधून तुमच्या विरोधातले उमेदवार असतील? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “वरळीत काही फरक पडत नाही, असले नसले तरी… सकाळी त्यांनी मला मेसेज केलाय की, वरळीत उभा नाही राहणार… पण या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट, कोणीही कुठूनही उभं राहिलं… आपण पाहिलं ना वाराणसीत एका उमेदवाराला मागे जावंच लागलं. ट्रेलिंग होतेच…”

पाहा व्हिडीओ: Aditya Thackeray : निकटवर्तीयाने साथ सोडली, बालेकिल्ला डगमगला? सचिन अहिरांच्या बंडावर काय म्हणाले?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sanjay Raut On Sachin Ahir: सचिन अहिर फुटताच संजय राऊतांकडून ‘तो’ फोटो ट्वीट, कवी सुरेश भटांच्या ओळी पोस्ट करत म्हणाले…

Comments are closed.