Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
कालपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या आमदार सचिन अहिरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जात विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरला. सहा खासदार फुटण्याच्या धक्क्यातून सावरत असताना यामुळे ठाकंना आणखी एक धक्का बसलाय. सचिन आहीर फुटल्यामुळे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यात अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सचिन अहिरांना गळाला लावून शिंदेच्या शिवसेनेन थेट आदित्य ठाकरेंचा बाले किल्ला भुसभुषित केल्याची चर्चा रंगली. सचिन अहीर फुटल्याचा धक्का आणि हताशा आदित्य ठाकरेंनाही लपवता येत नव्हती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता जोरदार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सहा खासदार सोडून गेल्याच्या संकटातून सावरता सावरता ठाकंना सचिन अहिरांच्या रूपाने आणखी एक धक्का बसलाय खासदारांनंतर आता ठाकरेंच्या आमदारांनाही गळाला लावण्याचे संकेत महायुतीचे नेते देत आहेत ही धाड परतवून लावण्यासाठी ठाकरे काही वेगळे उपाय करणार की पक्ष फुटण्याचा सिलसिला असा सुरू राहणार याकडे आता सर्वांच लक्ष राहणार आहे. अक्षय भाटकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा..
Comments are closed.