थिअरी-प्रॅक्टिकलचे अचूक मिश्रण
>>विजय केंकरे
केवळ मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीवर फार महत्त्वाचे कार्य विजयाबाईंनी केले. दिग्दर्शक म्हणून थिअरी आणि प्रॅक्टिकल याचं मिश्रण त्यांच्या कामातून दिसायचं. त्यांनी वैयक्तिक पातळीवर मला खूप शिकवलं. न शिकवता शिकवणं असतं, म्हणजे थेट शिष्यत्व नाही, पण तरीही मी त्यांच्याकडून खूप शिकलो. त्यांनी मराठी नाटकांमध्ये वास्तव रुजवले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा बाईंचे काम मोठे आहे. ‘अजब न्याय वर्तुळा’चा हे नाटक जर्मनीला गेले. जागतिक पातळीवर नाटकाचे प्रचंड कौतुक झाले होते. बाई नाटकावर खूप छान बोलायच्या. माझ्या भावना शब्दात सांगणं खरं तर कठीण आहे. माझा सर्वप्रथम त्यांच्याशी संबंध हा 1963मध्ये आला. ‘एक होती राणी’ या नाटकात विजयाबाई आणि डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका होती. त्यात मी छोटय़ा राजपुत्राचे काम केले होते. मला बाईंनी हात धरून स्टेजवर नेले. बाई खूप शिस्तप्रिय होत्या, त्यांची भीती वाटायची, पण त्या कधीही रागावल्या नाहीत. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
(लेखक हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.)
Comments are closed.