Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
तर ठाकरेंच्या शिवसेनेला एका मागून एक धक्के देणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेने आता शाब्दिक प्रहार देखील वाढवलेत. सचिन अहिऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाषा शिंदेच्या नेत्यांनी सुरू केली आहे. सचिन आला तर संपूर्ण क्रिकेटची टीमच येईल असा दावा करत बच्चू कडूंनी ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र ठाकरेंना चिमटा काढताना त्यांनी मित्रपक्ष असणाऱ्या भाजपचाही इगो दुखावलाय. राजकीय फोडाफोडी होणं आणि एका पक्षातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा झाला. एकेकाळी दुर्मीळ असणाऱ्या फोडाफोडीच्या घटना आता मात्र दैनंदिन राजकारणाचा भाग बनून गेल्यात. त्यामुळे सचिन अहिरा पाठोपाठ आता ठाकरेंना आणखी काही धक्के बसतात की ही गळती रोखण्याचे मार्ग शोधण्यात ठाकरे यशस्वी होतात हे लवकरच कळेल.
Comments are closed.