सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं

मुंबई : काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sahin Ahir) यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एबीपी माझाच्या ‘कॉफी विथ कौशिक’ या विशेष कार्यक्रमात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि काम करणाऱ्या नेत्यांना डावलले जात असल्याच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भाष्य केले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील क्रायटेरिया (निकष) आणि निष्ठावंतांच्या उपेक्षेवर त्यांनी बोट ठेवले आहे.(Sachin Ahir)

Sachin Ahir : बाबाजी काळे, सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचे राजकीय भविष्य काय?

बाबाजी काळेंचे यश आणि कार्यकर्त्यांची भावना मुलाखतीदरम्यान कौशिक यांनी विचारले की, ‘तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले बाबाजी काळे, सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचे राजकीय भविष्य काय? ते तुमच्यासोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दिसणार का?’ त्यांच्यावर न्याय होतो का? यावर उत्तर देताना सचिन अहिर म्हणाले, “पक्षाकडून आम्हाला काय मिळालं नाही, असं बोललं जातं. पण बाबाजी काळेंनी या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून दिलं आहे. पक्षातील २० आमदारांपैकी ५२ हजारांचे सर्वात जास्त लीड (मताधिक्य) घेऊन बाबाजी काळे निवडून आले. यामध्ये त्यांचे स्वतःचे कौशल्य होतेच, पण त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख करून पक्षानेही साथ दिली होती. आता पुढे काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु, माझ्यासोबत जे कार्यकर्ते पक्षात आले, त्यांना पक्षात सत्ता असतानाही मी काही देऊ शकलो नाही, याची लोकांमध्ये भावना आहे. कोविड काळ आणि महामंडळ वाटप न झाल्यामुळे ते शक्य झाले नाही, याचे शल्य कार्यकर्त्यांमध्ये आहे .”

Sachin Ahir : पक्षानेच स्वतःहून मुलीला काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती

कुटुंबाला पदे देण्यावरून आदित्य ठाकरेंच्या विधानाला उत्तर आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत अहिर म्हणाले, “माझ्या भावाला पूर्वी आम्ही राष्ट्रवादीत असताना बेस्टचे (BEST) सदस्यपद मिळाले होते . पुढे शिवसेना पक्षात आल्यानंतरही त्यांना ते पद देण्यात आले. मात्र, आताच्या निवडणुकीसाठी माझ्या भावाने स्वतःहून अर्ज भरलेला नाही. माझ्या मुलीच्या (ऐश्वर्या) बाबतीतही तिकीट देण्याबाबत चर्चा सुरू होती. पण जेव्हा मुंबईची ही मोठी राजकीय लढाई सुरू आहे, तेव्हा आपण स्वतःहून आदित्यजींसमोर कोणतीही अडचण किंवा अडथळा निर्माण करायचा नाही, असा निर्णय आम्ही कुटुंबाने घेतला आणि तिकीट मागितले नाही. आमच्या ‘संकल्प प्रतिष्ठान’ या एनजीओच्या सामाजिक कामाची दखल घेऊन, पक्षानेच स्वतःहून मुलीला काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सांगायचा हेतू हाच की, आपल्यासोबत आलेल्या लोकांना जर नेता म्हणून आपण सामावून (Accommodate) घेऊ शकलो नाही, तर लोक आपल्यावर विश्वास कसा ठेवणार?”, असंही ते म्हणालेत.

Sachin Ahir  :एक डॅशिंग प्रवक्त्या म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराचे असे अनेक विषय सभागृहाबाहेर लावून धरले

सुषमा अंधारे यांच्या उपेक्षेवर तीव्र नाराजी सुषमा अंधारे यांच्या कामाचा गौरव आणि त्यांच्या उपेक्षेवर बोलताना सचिन अहिर अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले, “२०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जात असताना, दुसऱ्याच दिवशी सुषमा ताईंचा फोन आला होता. तिसऱ्या दिवशी मी त्यांना मातोश्रीवर घेऊन गेलो. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, ‘मला काही नको, पण अशा कठीण प्रसंगी मी पक्षासोबत उभी राहीन.’ गेल्या चार वर्षांत त्यांनी पक्षासाठी काय केले नाही? लोकसभेपासून ते विधानसभेच्या १०० पेक्षा जास्त सभा घेतल्या . एक डॅशिंग प्रवक्त्या म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराचे असे अनेक विषय सभागृहाबाहेर लावून धरले, ज्यावर कोणीही बोलायला तयार नव्हते. पण आज जेव्हा विधान परिषदेची वेळ आली, तेव्हा पक्ष त्यांच्या नावाचा विचारच करत नाही.”

काम करणाऱ्यांना डावलल्यास आपण कुठे चाललोय? शेवटी पक्षाच्या एकूणच धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सचिन अहिर म्हणाले, “जेव्हा पक्षात क्रायटेरिया (पात्रतेचे निकष) काय? असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आता वाटू लागले आहे की, जर काम करणारी आणि अहोरात्र झटणारी लोकं या निकषात बसणार नसतील, तर मग आपण नेमकं कुठे चाललोय?”

Comments are closed.