छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंक

छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक निवडणूक: सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली गेलेली ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ (Chhatrapati Sambhajinagar District Central Co-operative Bank) निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) विरोधकांना धूळ चारत ऐतिहासिक विजयाचा झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत महायुतीने आखलेली तगडी रणनीती (Strategy) पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. बँकेच्या एकूण जागांपैकी बहुतांश जागांवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

या निवडणुकीत महायुतीने यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या 8 उमेदवारांना बिनविरोध (Unopposed) निवडून आणले होते. त्यानंतर उर्वरित 12 जागांसाठी मतदान (Voting) पार पडले. या 12 पैकी तब्बल 11 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांपैकी केवळ काँग्रेसचे खासदार कल्याण काळे (MP Kalyan Kale) यांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही. मविआच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ambadas Danve: अंबादास दानवे आणि अतुल सावेंसह दिग्गजांची बाजी

या निवडणुकीत सर्वात जास्त लक्षवेधी ठरली ती म्हणजे मतदानाद्वारे झालेली 12 जागांची लढत. यामध्ये महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्यासह मंत्री अतुल सावे (Atul Save) आणि भाजप आमदार अनुराधा चव्हाण,  शिवसेना आमदार संजना जाधव या बड्या नेत्यांनीही बाजी मारली आहे.

DCC Bank Election Winning Candidates: मतदानातून विजयी झालेले महायुतीचे 11 उमेदवार

1 अंबादास दानवे – ठाकरे गट आमदार (Ambadas Danve)

2 अतुल सावे – मंत्री, भाजप नेते (Atul Save)

3 अनुराधा चव्हाण – भाजप आमदार

4 संजना जाधव – शिवसेना संपर्कप्रमुख (संजना जाधव)

5 रवींद्र काळे (Ravindra Kale)

6 अर्जुन पाटील (Arjun Patil)

7 रामराव शेळके (Ramrao Shelke)

8 मुक्ता तांगडे (Mukta Tangde)

9 जाधव सुवर्णा

10 प्रभाकर काळे (Prabhakar Kale)

11 शेषराव जाधव (Sheshrao Jadhav)

DCC Bank Election: 8 उमेदवार आधीच झाले होते बिनविरोध

महायुतीने निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच मोर्चेबांधणी मजबूत केली होती. यामुळे पहिल्या टप्प्यातच महायुतीचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये प्रामुख्याने शिंदे गटाचे दोन बडे मंत्री आणि आमदारांचा समावेश होता.

1 संजय शिरसाट, मंत्री, शिवसेना शिंदे गट (Sanjay Shirsat)

2 विलास भुमरे – शिवसेना आमदार (Vilas Bhumre)

3 रमेश बोरणारे – शिवसेना आमदार (Ramesh Bornare)

4 अर्जुन गाडे

5 अनिल बोरसे (Anil Borse)

6 अब्दुल समीर

7 दिनेश परदेशी

8 संदीप निकम

DCC Bank Election: महाविकास आघाडीची निराशा; केवळ एका जागेवर समाधान

या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी मविआच्या पॅनलला साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. मविआचे सर्व प्रमुख उमेदवार एकामागून एक पराभूत झाले. केवळ एकमेव अपवाद ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे. खासदार कल्याण काळे यांनी आपली जागा राखत विजय मिळवला असून, ते मविआचे या निवडणुकीतील एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर आता पूर्णपणे महायुतीची सत्ता आली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Uddhav Thackeray: सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध, पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला; मंगळवारी मातोश्रीवर तातडीची बैठक

Comments are closed.