खेळता खेळता सांडपाण्याच्या खड्ड्याजवळ गेला अन्…साचलेल्या पाण्यात पडून 2 वर्षांच्या चिमुरड्याच

लोणी काळभोर: कंत्राटदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला आपला जीव (Pune Crime News) गमावावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले खोल खड्डे (Pune Crime News) कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा बॅरिकेड्स न लावता उघडेच सोडल्यामुळे हा अपघात घडला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  खेळता खेळता घडला अनर्थ

सोहम लखन कसबे (वय २ वर्ष) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कंत्राटदाराने चार मोठे खड्डे खोदले होते. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गुरुवारी सोहम आपल्या घरासमोर खेळत असताना, त्याचे लक्ष गेले नाही आणि तो अचानक या पाण्याच्या खड्ड्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

Pune Crime News:  सुरक्षा उपाययोजना शून्य; कामाची घाई नडली?

कंत्राटदाराने हे खड्डे खोदल्यानंतर तिथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. खड्ड्यांच्या भोवती फलक लावणे, दोरी किंवा पत्रे लावून तो परिसर प्रतिबंधित करणे आवश्यक होते. मात्र, हे काम अर्धवट अवस्थेत आणि अत्यंत बेजबाबदारपणे सोडून देण्यात आले होते, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. कंत्राटदाराच्या याच निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Pune Crime News:  कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, पोलिसांत गुन्हा

अंगावर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या सोहमचा असा अचानक डोळ्यादेखत अंत झाल्याने कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने पावले उचलत, लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.