सरकारने 'पिन' इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मान्यता दिली आहे.

सुरक्षितपणे उतरू शकणार हेलिकॉप्टर : एएआयकडून विकसित

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सरकारने आंध्रप्रदेशच्या उंडावल्ली हेलिपोर्टवर हेलिकॉप्टर संचालनासाठी देशाच्या पहिल्या स्वदेशी पॉइंट-इन स्पेस (पिन्स) इन्स्ट्रूमेंट अप्रोच प्रक्रियेला मंज्gरी देण्याची घोषणा केली आहे. पिन्स (पॉइंट-इन-स्पेस) प्रक्रिया अत्याधुनिक उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे हेलिकॉप्टर अशा हेलिपोर्टवरही सुरक्षित आणि अचूक इन्स्ट्रूमेट अप्रोच करू शकतात, जेथे पारंपरिक इन्स्ट्रूमेट लँडिंग सुविधा उपलब्ध नाही. ही प्रणाली विशेष स्वरुपात प्रतिकूल हवामान आणि जमीन आधारित नेव्हिगेशन सुविधा नसलेल्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या प्रक्रियेला विकसित केले आणि डीजीसीएने याला मंजुरी दिली. डीजीसीएचे नियम आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मापदंड आणि शिफारसयुक्त प्रक्रियांच्या अनुरुप ही प्रणाली विकसित करण्यात आली.

नव्या युगाची सुरुवात

पिन्स इन्स्ट्रूमेंट अप्रोच प्रक्रियेची सुरुवात हेलिकॉप्टर संचालनाच्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे उड्डाण सुरक्षा, संचालन क्षमता आणि सर्वप्रकारच्या हवामानात पोहोच सुनिश्चित करण्याच्या क्षमतेत उल्लेखनीय सुधार होईल, असे उद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी काढले.

हेलिकॉप्टर सेवेचा विस्तार पिन्स इन्स्ट्रूमेंट अप्रोच प्रक्रिया

परफॉर्मन्स बेस्ड नेव्हिगेशनद्वारे विमानोड्डाण संरचनेचे आधुनिकीकरण, स्वदेशी उपग्रह आधारित दिशादर्शन तंत्रज्ञानांचा विस्तार आणि भारताच्या विमानोड्डाण व्यवस्थेला जागतिक मापदंडांच्या अनुरुप करण्याच्या सरकारच्या योजनेला मजबुती देईल. या मंजुरीनंतर देशभरात अशाप्रकारच्या पिन्स प्रक्रियांच्या विकासाचा मार्ग खुला होणार आहे.

विश्वसनीय ऑपरेशन

आमची सर्वात मोठी प्राथमिकता आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून देशभरात हेलिकॉप्टर संचालन अधिक विश्वसनीय आणि सुलभ करणे आहे. यंदा चारधाम हेलिकॉप्टर सेवांच्या पहिल्या टप्प्याचे संचालन प्रगत तंत्रज्ञानाच्या सहकार्याने कुठल्याही दुर्घटनेशिवाय यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. आमची प्रतिबद्धता भारतात तंत्रज्ञान आधारित आणि जागतिक मापदंडांच्या अनुरुप हेलिकॉप्टर इकोसिस्टीम तयार करण्याची असल्याचे नायडू यांनी सांगितले आहे.

Comments are closed.