‘सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका…’; बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं
पुणे केतल अग्रवाल हत्या प्रकरणाचे संचालक संजय गुप्ता यांची प्रतिक्रिया: पुण्यातील (Pune News) बड्या व्यावसायिक कुटुंबाचा उच्चशिक्षित लेक केतन अग्रवाल प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आधी आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाला पोलिसांनी कसून केलेल्या तपासात वेगळं वळण मिळालं आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. केतन अग्रवालला (Ketan Agarwal) त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) हिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून लोहगडावरुन (Lohagad) ढकलून दिल्याचं समोर आलंय आणि पोलिसांच्याही पायाखालची जमिन सरकली. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांनी केतनचा खून पचवलाच होता, पण पोलिसांना संशय आला आणि दोघांचा पर्दाफाश झाला.
पुण्यातील (Pune) व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र दुःख व्यक्त केलं जातंय. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिनंच त्याला लोहगडावरून खाली ढकलून त्यांचा जीव घेतल्याचं उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा आणि सिया गोयलला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वत्र केली जातेय. अशातच बॉलिवूडच्या एका बड्या दिग्दर्शकानं सियाची बाजू घेतल्यानं संतापाची लाट उसळली आहे.
निर्णयात उभे नाही. बाजू घेत नाही. फक्त म्हणतो – रियाला जे केले ते सियाशी करणे थांबवू का?
आम्ही सर्वांनी ती सर्कस पाहिली. टेलिव्हिजनद्वारे चाचणी. पुराव्यासमोर निकाल.
आपण कधीच शिकत नाही.— संजय गुप्ता (@_संजयगुप्ता) १ जुलै २०२६
सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा सखोल तपास करत सुरू आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आलीय. सियाबाबत विविध गोष्टी समोर येत असून सोशल मीडियावर त्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. पण, बॉलिवूडचे वडे निर्माते संजय गुप्ता यांनी, सियासोबत तशीच वागणूक दिली जात आहे, जशी 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत दिली गेली होती…, असं म्हणत एक प्रकारे सियाची बाजू घेतली आहे. त्यामुळे सध्या ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेत.
बॉलिवूडचा बडा निर्माता सिया गोयलवर काय बोलून गेला?
सोशल मीडियावर केतन अग्रवाल प्रकरणाबाबत पोस्ट केल्यामुळे संजय गुप्ता अडचणीत सापडलेत. संजय गुप्ता यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना, सियाची बाजू घेतलीय. त्यांनी लिहिलंय की, “मी कोणावरही आरोप करत नाहीये किंवा कोणाची बाजूही घेत नाहीये. मी फक्त एवढंच विचारतोय, रिया (चक्रवर्ती) सोबत जे घडलं, तेच सियासोबत करणं आपण थांबवू शकतो का? तो तमाशा आपण सर्वांनी पाहिला होता, नाही का? टीव्हीवर खटला चालवला गेला आणि कोणताही पुरावा समोर येण्याआधीच निकालही जाहीर झाला. तरीही, आपण काहीच शिकत नाही…”
दिग्दर्शकानं केलेली ही वक्तव्य कोणालाच पटली नाहीत. सिया गोयल आणि रिया चक्रवर्ती यांच्या प्रकरणांची तुलना केल्याबद्दल लोकांनी त्यांच्यावर कडक टीका केलीय. एका युजरनं लिहिलंय की, “कधीकधी तुम्ही वादात विचार न करताच बाजू निवडता. इतका प्रयत्न करू नका, सर. तुम्ही कोणाची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात?”
दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, “जर तुम्हाला शिव्या खायच्या असतील तर तसं सांगा, विनाकारण कशाला संकट ओढवून घेताय?” हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, केतन अग्रवाल प्रकरणामुळे सियाविरुद्ध लोकांचा रोष सध्या शिगेला पोहोचलाय आणि म्हणूनच संजय गुप्ता यांना त्यांच्या या टिप्पणीमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
रिया चक्रवर्तीचं प्रकरण नेमकं काय?
रिया चक्रवर्ती प्रकरणाचा विचार करता, अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर, अंमली पदार्थांशी संबंधित एका प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ यांना ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’नं (NCB) अटक केली होती. सोशल मीडियावर लोक या अभिनेत्रीच्या विरोधात गेले आणि न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच तिला आरोपी ठरवण्यात आलं. तरीही, तिच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही आणि पाच वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर, 2025 मध्ये तिला न्यायालयाकडून दिलासा मिळाला. असं असलं तरी, या प्रकरणाचा अद्याप निश्चित असा निकाल लागलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Comments are closed.