प्रत्येक घरात नेहमी असाव्यात या 10 आवश्यक वस्तू

आपण अनेक महागड्या वस्तू घराची शोभा वाढवण्यासाठी खरेदी करतो. मात्र, अनेकदा दैनंदिन गरजांचा आपल्याला विसर पडतो. घरात एखादी छोटी दुर्घटना घडल्यास किंवा ऐनवेळी कोणती वस्तू खराब झाल्यास आपली मोठी धावपळ होते. म्हणूनच, प्रत्येक घर सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी काही गोष्टी घरात असणे अनिवार्य असते. Essential Home Items in Marathi

प्रथमोपचार किट

स्वयंपाक करताना किरकोळ भाजणे, रक्त येणे किंवा अचानक मध्यरात्री ताप-पोटदुखी सुरू झाल्यास फर्स्ट एड किट उपयोगी पडू शकते. यात बँड-एड, कापूस, अँटीसेप्टिक लिक्विड, बर्न मलम आणि तापाच्या काही प्राथमिक गोळ्या ठेवाव्यात.

टॉर्च

पावसाळ्यात अनेकदा तासनतास वीज जाते. घरात एक चांगली चार्ज असलेली टॉर्च किंवा इमर्जन्सी लाईट असणे अत्यंत आवश्यक आहे.

टूल किट

नळ सुटणे, खिडकीचा स्क्रू ढिला होणे किंवा एखादी वस्तू भिंतीवर टांगणे अशा छोट्या कामांसाठी प्रत्येक वेळी मेकॅनिकची वाट पहावी लागू नये, यासाठी घरात एक लहान हातोडी, वेगवेगळ्या आकारांचे स्क्रू-ड्रायव्हर्स आणि पक्कड असायलाच हवे.

थर्मामीटर

घरात कोणालाही अस्वस्थ वाटू लागल्यास डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी शरीराचे तापमान आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी हे गॅजेट्स घरात असणे सोयीचे पडते.

सुई धाग्याचा डबा

अनेकदा बाहेर जाताना बटण तुटणं किंवा शिलाई निघणे अशा गोष्टी घडतात. अशावेळी पंचायत होऊ नये यासाठी घरात सुई धाग्याचा डब्बा असावा.

अन्न आणि पाण्याचा साठा

मुसळधार पाऊस, पूर यामुळे कधीकधी घराबाहेर पडणे अशक्य होते. अशा वेळी घरात किमान 4 दिवस टिकेल इतके पिण्याचे पाणी, बिस्किटे, सुका मेवा यांचा साठा असावा.

लहान अग्निशामक यंत्र

स्वयंपाकघरात छोटी आग लागण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. ही आग वेळीच विझवण्यासाठी आणि  छोटे फायर एक्सटिंग्विशर असावे.

सॅनिटरी पॅड्स

महिलांसाठी लागणारे सॅनिटरी नॅपकिन्स, हँडवॉश, सॅनिटायझर आणि लिक्विड सोप यांचा पुरेसा स्टॉक घरात नेहमी असायला हवा.

कागदपत्रांचे वॉटरप्रूफ फोल्डर

घराची मूळ कागदपत्रे, बँक पासबुक, आधार-पॅन कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे एकाच वॉटरप्रूफ फोल्डरमध्ये ठेवावीत.

हेही वाचा – भारतातील असे व्यवसाय जिथे ग्राहक लाखो पण स्पर्धा शून्य!

Comments are closed.