जगातील या शहरात पडतो माशांचा पाऊस; कुठे घडते ही घटना?




रेनिंग फिश होंडुरास


पाऊस सुरू झाला की आकाशातून पाण्याचे थेंब किंवा गारा पडणे सामान्य आहे. पण जगाच्या पाठीवर एक असेही ठिकाण आहे, जिथे पाऊस पडताना थेट आकाशातून जिवंत मासे जमिनीवर पडतात. मध्य अमेरिकेतील एके ठिकाणी दरवर्षी हा अजब पाऊस पडतो, ज्यानंतर रस्ते आणि घरांची छतं माशांनी भरून जातात. या अजब पावसामागचं रहस्य पाहूयात सविस्तरपणे,

होंडुरास

मध्य अमेरिकेतील छोटासा देश होंडुरासमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून माशांचा पाऊस पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा देश मेक्सिकोच्या जवळ आहे. येथील काही भागांमध्ये वर्षांतून एकदा तरी माशांचा पाऊस पडतोच. स्थानिकांच्या मते ही घटना वसंत ऋतूच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला घडते. माशांचा पाऊस पडताच नागरिक हे मासे घेऊन घरी जातात आणि खातात.

विज्ज्ञान काय सांगतं?

शास्त्रज्ज्ञांच्या मते, या घटनेमागे वातावरण आणि समुद्राशी संबंधित काही नैसर्गिक कारणे असू शकतात. असं मानलं जातं की, कधी कधी मोठी वादळं समुद्रातील लहान लहान मासे खेचून नेतात आणि वादळ शांत झालं की हेच मासे जमिनीवर पडतात.

स्थानिक काय सांगतात?

19 व्या शतकात एका स्पॅनिश धर्मगुरूने गरीब लोकांसाठी तीन दिवस आणि तीन रात्र प्रार्थना केली होती. त्यांनी देवाकडे लोकांच्या जेवणाची सोय कर अशी मागणी केली होती. या मागणीनंतर तेथे अचानक अंधार झाला आणि पावसासोबत मासेही पडले. तेव्हापासून ही घटना घडत आहे, असं स्थानिक सांगतात.

हेही वाचा – घरात पाळण्यासाठी कुत्रा आणि मांजरीच्या सुरक्षित प्रजाती



Comments are closed.