शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती; भरपावसातही उसळली रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज मुंबईत ‘रामरक्षा’ आंदोलन केले. दादर येथील ऐतिहासिक मारुती मंदिराजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. विशेष म्हणजे, मुसळधार पावसाची तमा न बाळगता या आंदोलनासाठी रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.

प्रभू श्रीरामाच्या नावावर अमर्याद सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या राजवटीतच अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा पडल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये तीव्र संताप असून, या लुटीचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

दादरच्या कबुतरखान्याजवळ असलेल्या ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर या रामरक्षा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भरपावसातही मुंबई, महाराष्ट्र व देशातील समस्त हिंदू आणि रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळी होती.

Comments are closed.