हिंदूंनी जागं राहावं, कोणी मंदिर लुटत असेल तर अब हिंदू माफ नही करेगा, उद्धव ठाकरेंचा इशारा
उद्धव ठाकरे राम रक्षा आंदोलन मुंबई : अयोध्येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आलं. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती तसेच रामरक्षा स्त्रोत आणि हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत पठणाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात केली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देशातील तमाम हिंदूंना जागं केलं होतं,विखुरलेल्या एक केलं होतं, आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे.
आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत पण मूर्ख नाही आहोत, आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय अब हिंदू माफ नही करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, मंदिर वही बनायेंगे पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत तेवढं दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल. शिला पूजन, रथयात्रा, अयोध्येत जाऊन कार सेवा केली होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हिंदू आजही भरडला जातोय
मुंबई शहरानं जे भोगलं ते क्वचित एखाद्या शहरानं भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा देशातील एकच मर्द शिवेसनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला होता. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, तेव्हा आधार शोधत होता, त्यावेळेला शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला, नको ती लोकं सत्ता भोगत आहेत, हिंदू आजही भरडला जातोय,असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील
बारा वर्ष झालीत, आज आपण ज्यासाठी मेहनत केली होती.ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलाखानी विडा उचलला. का उचलला कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना शिवसैनिक, एकच शिवसेना देशात अशी आहे, समोर उभी राहून निधड्या छातीनं त्यांना प्रश्न विचारु शकेल. काय वातावरण होतं, अयोध्या तो झांकी है, काशी मुथरा बाकी है. मला आता भीती वाटायला लागली, ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
बारा वर्षात आपल्या भगव्याचं सरकार तिकडं आलं असताना आपल्याला वाटत होतं, अब हिंदू मार नही खायेगा, मात्र हिंदूंना लुटणारं सरकार तिथं बसलंय हे आपलं दुर्भाग्य आहे. पहिली सुरुवात शंकराचार्यांनी केली, केदारनाथातील सोनं लुटलं गेलं. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटली गेल्याचे आरोप झाले. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येत एक आयएएस ऑफिसर बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलोचा सोन्याचं मुलामा असलेलं रामचरितमानस गायब झालं, नऊ नऊ तास बसवलं जातं पण उत्तर दिलं जात नाही. शिवसेनेनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेलं सगळं, असा सवाल उद्ध ठाकरेंनी केला.
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.