पाकव्याप्त कश्मीरमध्ये 40 हजार निदर्शकांवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार; अनेक महिला, मुले, वृद्ध गंभीर जखमी कोणतीही पूर्वसूचना नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकव्याप्त कश्मीरमध्ये शांततेने निदर्शने करणाऱ्या 40 हजार नागरिकांच्या रॅलीवर पाकिस्तानी सैन्याने निर्दयीपणे गोळीबार केला. त्यात शेकडो जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान सरकारच्या विरोधात ही निदर्शने करण्यात येत होती.

प्राप्त माहितीनुसार जम्मू-कश्मीर जॉइंट अवामी ऍक्शन कमिटीने डुडियाल येथील सरदार गुलाम हुसैन खान स्टेडियम येथे निदर्शने आयोजित केली होती. त्यात सुमारे 40 हजार निदर्शक सहभागी झाले होते. त्यात महिला, मुले तसेच वृद्धांचा मोठय़ा संख्येने सहभाग होता. हे सर्व जण वेगवेगळ्या भागातून पोहोचले होते. शांततेने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर पाकिस्तानी सैन्याने कोणतीही सूचना न देता गोळीबार केला. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. पाकिस्तानने कमिटीचे प्रमुख सदस्य शौकत मीर यांना अटक केली आहे. त्यांच्या सुटकेची मागणी कमिटीने केली आहे.

शौकत मीरच्या अटकेनंतर वाढला तणाव

कमिटीच्या वतीने सांगण्यात आले की, हे आंदोलन पाकिस्तान सरकारविरोधात होते. तसेच कमिटीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या अटकेच्या विरोधात तसेच पाकव्याप्त कश्मीरमधील जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी ही निदर्शने करण्यात आली होती. शौकत नवाज मीर यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकव्याप्त कश्मीरमध्ये तणाव वाढला आहे. अटक करण्यात आलेले नेते व कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणीही कमिटीने केली आहे.

Comments are closed.