ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ पुरुष संघापेक्षा खतरनाक! आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात बराचं पुढे
रविवारी (५ जुलै) लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा ७ विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मग तो कोणताही असो, महिला किंवा पुरुष, आयसीसी ट्रॉफी म्हटली की तो आणखी धोकादायक ठरतो. त्यांनी मिळून एकूण २४ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावरून त्यांचे क्रिकेटमधील एकहाती वर्चस्व दिसून येते.
आयसीसी स्पर्धांमध्ये आपण जर महिला आणि पुरुष संघांची तुलना केली, तर ऑस्ट्रेलियाचा महिला संघ पुरुष संघापेक्षा अधिक वरचढ असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाने आतार्यंत वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० विश्वचषकासह १० आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. दुसरीकडे महिला संघाने नुकतेच १४ वी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सात वनडे विश्वचषक जिंकले आहेत. त्यांनी १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३ आणि २०२२ मध्ये ही कामगिरी केली. तर हे त्यांचे सातवे टी २० विश्वचषक विजेतेपद आहे. याआधी त्यांनी २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२० आणि २०१३ मध्ये ही कामगिरी केली आहे.
सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारे संघ
महिला क्रिकेट संघ
ऑस्ट्रेलिया – १४
इंग्लंड – ५
न्यूझीलंड – २
भारत – १
वेस्ट इंडिज – १
पुरुष क्रिकेट संघटना
ऑस्ट्रेलिया – १०
भारत – ८
वेस्ट इंडिज – ५
पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड – ३
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका – २
ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इंग्लंडचे खच्चीकरण केले
इंग्लंड महिला क्रिकेट संघाने २००९ मध्ये पहिले टी २० विश्वचषक विजेतेपद जिंकले होते, मात्र गेल्या १७ वर्षांपासून ते दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी अनेकदा अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र बहुतेक वेळा ऑस्ट्रेलियाने त्यांची निराशा केली आहे.
इंग्लंड २०१२, २०१४ आणि २०१८ या टी २० विश्वचषकांच्या आवृत्तींच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता आणि प्रत्येकी वेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले. २०२६ च्या आवृत्तीमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली.
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५१ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने ते १७.१ षटकांत ३ विकेट्स गमावत पार केले.
Comments are closed.