रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसा

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या पावसावर: राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे.  दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे (Mumbai Pune Rain Updates Marathi News)

राज्यभरात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain News) बरसत आहे. पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी रस्ते खचलेत. तर काही ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तर रायगड जिल्ह्यात काल पासूनची पुर परिस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा या नद्या धोकादायक परिस्थितीत वाहत असून महाड, रोहा, नागोठणे, पेण, खोपोली शहरात होते रात्रभर पुराचे पाणी साचलेले होते.  काही प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली असली तरी आज रायगड जलमय झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. (Maharashtra Rain Updates)

आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, नागरिकांनी प्रवास टाळावा- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Maharashtra Rain)

आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. दुपारनंतर सोसाट्याचे वारे वाहणार आहे. नागरिकांनी प्रवास टाळावा. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही प्रवास करु नये. परिस्थिती गंभीर आहे, असं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 50 किमी ताशी वार वाहत आहेत. 800 झाडं प्रत्येक वर्षी पडतात. काल एका दिवसात साडेतीनशे झाडं पडलीत. मिसिंग लिंकवरील दरड हटवण्याचं काम सुरु आहे. आज दुपारी हवेचा वेग मोठा असेल. त्यामुळे शक्यतो प्रवास टाळावा, तरुणांनी पर्यटनस्थळी जाऊ नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलं.

राज्यातील परिस्थितीचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण- (Devendra Fadnavis On Maharashtra Rain)

राज्यातील परिस्थितीचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे निसर्गाचं चक्र बदललं आहे. त्यामुळे झालं आहे. यासंदर्भात कुठलीही तयारी केली नाही, असं नाही. परंतु या तयारीनंतरही विपरीत घटना घडल्या. राज्याच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे रस्त्यावर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागरिकांनी प्रवास टाळावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहान, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Rain News: मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, शासनाकडून अधिसूचना जारी

Comments are closed.