पावसाळ्यात गरमागरम सूपचे ६ भन्नाट प्रकार
खिडकीबाहेर कोसळणारा पाऊस, हातात गरमागरम सूपचा बाऊल आणि त्यातून येणारी वाफ… यापेक्षा सुखद क्षण दुसरा कोणता? पावसाळ्यात भजी आणि चहाची आठवण येतेच, पण शरीराला उब देणारे, पोटाला हलके आणि पौष्टिक सूपही तितकेच उत्तम पर्याय ठरतात. monsoon soup recipe
१. टोमॅटो सूप
साहित्य : टोमॅटो ४, बटर १ टेबलस्पून, लसूण ३ पाकळ्या, मिरीपूड, मीठ, साखर चिमूटभर.
कृती : टोमॅटो उकडून प्युरी करा. बटरमध्ये लसूण परता, त्यात टोमॅटो प्युरी घालून ८ मिनिटे शिजवा. मीठ, मिरी आणि चिमूटभर साखर घालून गरम सर्व्ह करा.
2. स्वीट कॉर्न सूप
साहित्य : स्वीट कॉर्न २ कप, गाजर, पातकोबी, कॉर्नफ्लोअर १ टीस्पून, मीठ, मिरी.
कृती : भाज्या आणि कॉर्न शिजवा. कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घाला. मीठ, मिरी घालून ५ मिनिटे उकळवा आणि गरम सर्व्ह करा.
३. मिक्स व्हेज क्लिअर सूप
साहित्य : गाजर, फरसबी, पातकोबी, आले, लसूण, मिरी, मीठ.
कृती : सर्व भाज्या थोड्या परतून त्यात पाणी घाला. १० मिनिटे उकळवा. मीठ, मिरी घालून गाळून किंवा तसेच सर्व्ह करा.
4. मशरूम मिरपूड सूप
साहित्य : मशरूम २०० ग्रॅम, बटर, लसूण, दूध ½ कप, मिरीपूड, मीठ.
कृती : बटरमध्ये लसूण आणि मशरूम परता. मिक्सरमध्ये वाटून दूध घाला. ५ मिनिटे उकळवा आणि मिरी घालून सर्व्ह करा.
५. पालक लसूण सूप
साहित्य : पालक २ जुड्या, लसूण ५ पाकळ्या, बटर, मिरी, मीठ.
कृती : पालक उकळून प्युरी करा. बटरमध्ये लसूण परतून त्यात पालक प्युरी घाला. मीठ, मिरी घालून ५ मिनिटे शिजवा.
६. भोपळ्याचे क्रीमी सूप
साहित्य : लाल भोपळा २ कप, बटर, कांदा, दूध ½ कप, मिरी, मीठ.
कृती : भोपळा आणि कांदा शिजवून प्युरी करा. बटरमध्ये परतून दूध घाला. मीठ, मिरी घालून ५ मिनिटे उकळवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Comments are closed.