संजू सॅमसनचे वाईट दिवस सुरू! झिम्बाब्वेनंतर आता एशियन गेम्समधूनही होणार OUT, ‘या’ खेळाडूला घेण्
संजू सॅमसन एशियन गेम्स स्क्वॉड अपडेट: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पुन्हा एकदा संकटाचे ढग जमा झाले आहेत. समोर आलेल्या वृत्तांनुसार, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) जाहीर झालेल्या भारतीय संघात ऐनवेळी काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सॅमसनची सद्यस्थितीतील सुमार कामगिरी पाहता, त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे.
खराब फॉर्ममुळे संजूची अडचण
संजू सॅमसनसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचे दौरे अत्यंत निराशाजनक राहिले. या दौऱ्यांवरील तीन सामन्यांमध्ये त्याला फक्त 6 धावा करता आल्या. या खराब कामगिरीचा फटका त्याला संघातून डच्चू मिळून बसला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याचदा खेळाडूला विश्रांती देणे आणि संघातून ड्रॉप करणे यातील फरक अस्पष्ट असतो, ज्यामुळे त्याच्या सद्यस्थितीबाबत अजूनही पूर्ण स्पष्टता नाही. तरीही, झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतूनही त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. हा संघ व्यवस्थापन आता इतर पर्यायांचा विचार करत असल्याचा स्पष्ट संकेत आहे.
संजूच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी
संजू सॅमसन अपयशी ठरत असतानाच, दुसरीकडे युवा खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याच्यासमोरील अडचणी अधिक वाढवल्या आहेत. संघ व्यवस्थापनाने प्लेईंग इलेव्हनमध्ये संजूच्या जागी फॉर्मात असलेल्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संधी दिली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी जेव्हा वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाची कॅप दिली जात होती, तेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे संजू सॅमसनसोबत खूप गंभीर चर्चा करताना दिसले होते. यावरून मुख्य प्रशिक्षक सॅमसनच्या कामगिरीवर अजिबात खूश नसल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रभसिमरन सिंग ठरणार संजूचा पर्याय?
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात संजू सॅमसनच्या जागेवर आता पंजाब किंग्सचा यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग याने आपला प्रबळ दावा ठोकला आहे. आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या प्रभसिमरनकडे सॅमसनचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे. प्रभसिमरनकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभवही आहे, तो 2023 च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
भारतीय संघात ऐनवेळी बदल होण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जून महिन्यातच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्राथमिक संघाची घोषणा केली होती. मात्र, नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघात बदल केले जाऊ शकतात. यासाठी बीसीसीआय संबंधित अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी घेण्याच्या प्रक्रियेत आहे. आयपीएलपासून सुरू झालेला संजू सॅमसनच्या फॉर्मचा चढ-उतार आता त्याच्या कारकिर्दीसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरताना दिसत आहे, जिथून त्याचे पुनरागमन करणे सध्या तरी कठीण मानले जात आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.