मुंबईकरांसाठी गूड न्यूज! विहार तलाव ओव्हरफ्लो; मिठी नदीकडे पाण्याचा विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या सात तलावांपैकी एक असलेला महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ सोमवारी रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी हा तलाव १८ ऑगस्ट २०२५ रोजी भरला होता, मात्र यंदा तो लवकर भरल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या तलावातून वाहणारे अतिरिक्त पाणी आता मिठी नदीत जाऊन मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये विहार आणि तुळशी हे तुलनेने लहान तलाव समजले जातात. १८.९६ चौ. कि.मी. पाणलोट क्षेत्र असलेल्या विहार तलावाचे बांधकाम १८५९ साली करण्यात आले होते आणि त्या काळी यासाठी सुमारे ६५.५ लाख रुपयांचा खर्च आला होता. हा तलाव पूर्ण भरल्यानंतर पाण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७.२६ चौ. कि.मी. इतके होते.

विहार तलावाची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर (२,७६९.८० कोटी लिटर) इतकी आहे. या तलावातून मुंबई शहराला दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) पाण्याचा पुरवठा केला जातो. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईच्या पाणीचिंतेत मोठी घट झाली आहे.

Comments are closed.