तिरुचिरापल्ली येथील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
तिरुचिरापल्ली:
तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील अरियमंगलम भागात एका प्लास्टिक गोदामाला अचानक भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाने तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या दुर्घटनेत किती नुकसान झाले आणि आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी जून महिन्यात रानीपेट येथील एका भंगार युनिटमध्ये भीषण आग लागली होती. ही घटना एका खासगी कंपनीत घडली होती. तेथे शॉर्ट सर्किटमुळे ज्वलनशील पदार्थ आणि रसायनांनी त्वरित पेट घेतला होता. स्थानिक लोकांनी यासंबंधी कळविल्यावर अग्निशमन दलाच्या वाहनांनी तेथे धाव घेतली होती. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले होते. त्या घटनेत लाखोंची सामग्री जळून खाक झाली होती. तर सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.
Comments are closed.