इंग्लंडसमोर टीम इंडियाची शरणागती, तिसऱ्या टी20मध्ये भारताचा सुपडा साफ; इतिहासातील सर्वात मोठा पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामना नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, यजमान इंग्लंडने फिलिप सॉल्टच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 7 बाद 201 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 76 धावाच करु शकला, परिणामी टीम इंडियाचा 125 धावांनी दारुण पराभव झाला. ENGLAND BEAT TEAM INDIA BY 125 RUNS
सलामीवीर फिलिप सॉल्ट PHIL SALT हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 44 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. सॅम करनने SAM CURRAN 24 चेंडूंत नाबाद 41 धावांचे योगदान दिले. भारताकडून हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अक्षर पटेलने एक बळी मिळवला.
202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या पाच षटकांतच पाच फलंदाज बाद झाले. त्यानंतरही पडझड सुरूच राहिली; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, TEAM INDIA BIG LOSS परिणामी संपूर्ण संघ 11.4 षटकांत केवळ 76 धावांत गारद झाला.
इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये जोश टोंगने सर्वाधिक चार बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरने तीन फलंदाजांना बाद केले. आदिल रशीदने दोन आणि विल जॅक्सने एक बळी घेतला.
वैभव सूर्यवंशी आणि ईशान किशन हे भारताकडून संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले, दोघांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. संघातील सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
या पराभवासह भारताचा सलग दुसरा पराभव झाला असून, आता पाच सामन्यांच्या मालिकेत भारत पिछाडीवर पडला आहे. TEAM INDIA WITH 0-2 IN THIS SERIES मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यातही भारताला मोठा पराभव पत्करावा लागला होता.
Comments are closed.