VIDEO: संजू सॅमसनला संघातून वगळल्याबद्दल हेड कोच गंभीरने सोडले मौन; म्हणाले, “मी त्याला स्पष्टच सांगितले…”

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी २० संघ अद्यापही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. संघाने आयर्लंड दौऱ्यात आणि आता इंग्लंड दौऱ्यात प्रत्येकी दोन-दोन सामने गमावले आहेत. तीन सामन्यांमध्ये वाईट कामगिरी केल्याने २०२६ टी २० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्त्कृष्ट खेळाडू संजू सॅमसनला संघातून वगळले आहे, मात्र याचा संघाच्या निकालावर काहीही परिणाम झाला नाही.

सॅमसन मागील दोन सामन्यांपासून बाकावर बसला आहे. आता मात्र त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी थेट संघातून वगळले. याबद्दल भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाले, “सर्वप्रथम, मी संजू सॅमसनला आवश्यक असलेली स्पष्टता दिली आहे. हे खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यातील संभाषण आहे. आम्ही हा संवाद बाहेर कोणालाही सांगणार नाही. स्पष्टतेबद्दल बोलायचे तर, आम्ही संजूबाबत पूर्णपणे स्पष्ट आहोत. त्याने टी २० विश्वचषकात भारतासाठी जे काही केले ते विलक्षण आहे, आणि आपल्याला एखाद्या विशिष्ट खेळाडूचा फॉर्म पाहावा लागतो.”

“या मालिकेत तो पुनरागमन करू शकत नाही, असा कोणताही पक्का नियम नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकालांना अधिक महत्त्व असते. आम्हाला जी संघरचना सर्वोत्तम वाटते आम्ही त्याच संघरचनेने खेळतो. माझा नेहमी ठाम विश्वास राहिला आहे की प्रत्येकाला आपले स्थान निर्माण करावे लागत, प्रत्येकाला भारतासाठी खेळण्याचा हक्क कमवावा लागतो,” असेही गंभीर यांनी पुढे म्हटले आहे.

भारताच्या सततच्या अपयशाबाबत गंभीर म्हणाले, “आम्ही परिस्थितीशी नीट जुळवून घेऊ शकलो नाही. आयर्लंड असो वा इंग्लंड, यामुळेच आम्हाला अशा निकालांना सामोरे जावे लागत आहे. चांगले क्रिकेट खेळलो असतो तर आम्ही चार सामने गमावले नसते.”

भारताने आयर्लंडमध्ये ०-२ अशी मालिका गमावली आहे, तर इंग्लंड दौऱ्यात भारत पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत ०-२ असा मागे आहे. यामुळे इंग्लंड केवळ एक विजय मिळवताच ही मालिका जिंकू शकतो आणि भारताला मालिका अनिर्णीत राखण्याचे प्रयत्न करावे लागतील. (Team India Head Coach Gautam Gambhir breaks silence on dropping Sanju Samson from the squad)

Comments are closed.