दत्तराज कॅरम स्पर्धेत मधुरा व घुफ्रान विजयी
श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कोल्हापूर येथे कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने जेतेपद पटकावले. आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर त्याने पुण्याच्या रहिम खानचा 25-0, 25-15 असा सहज धुव्वा उडवत विजेतेपदाला गवसण घातली. महिला एकेरीचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. यात ठाण्याच्या मधुरा देवळेने पालघरच्या श्रुती सोनवणेचा 18-21, 22-8 व 25-4 असा पराभव करत आपले पहिले विजेतेपद पटकावले.
पुरुषांमध्ये तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने पुण्याच्या अभिजित त्रिपणकरचा तीन सेटनंतर 20-11, 3-25 व 18-13 असा पराभव केला. महिलांमध्ये तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या ऐशा साजिद खानने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेवर रंगतदार लढतीत 18-15, 18-22 व 22-8 असा विजय मिळवला.
Comments are closed.