अंधेरी सबवेजवळ झाड कोसळून 50 वर्षीय पादचारी गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वास्कोमध्ये सकाळी 6 वाजता दुचाकीस्वारावर झाड पडले

मुंबईच्या अंधेरी (पूर्व) भागात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. अंधेरी सबवेजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या एका 50 वर्षीय पादचाऱ्याच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. आदेश गायकर असे या जखमी पादचाऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात  उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवार, दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजून 12 वाजताच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नगरदास रोडवरील डी. जे. हाऊस आणि अंधेरी सबवे परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड कोसळून पादचारी आदेश गायकर यांच्या अंगावर ते पडले. वॉर्ड कंट्रोलकडून या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशामक दल , स्थानिक पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि मनपाचा उद्यान विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवून पडलेली फांदी बाजूला केली आणि रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली.

कूपर रुग्णालयाचे एएमओ डॉ. शिराळे यांनी जखमीच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, अपघातानंतर आदेश गायकर यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Comments are closed.