शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानी पतीनेही रुग्णालयात सोडला जीव
नाशिक : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, गेल्या महिन्यात 28 जून रोजी नाशिक जिल्ह्याच्या बागलाणातील आखतवडे (नाशिक) येथे एका शेतकरी दाम्पत्यानी रात्री चिकन आणि दही खाल्ल्यानंतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक निसर्ग (रुग्णालय) बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे, या विषबाधा प्रकरणाचे गुढ आणखी वाढले असून दोघांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. रविवार 28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलं आहे.
अन्न व औषध प्रशासना विभागाचे पथक पोहोचले
दरम्यान, या घटनेनंतर सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) टीम दाखल झाली होती. टीमकडून संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल) संकलितही करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. चिकनमुळे विषबाधा झाली की इतर कोणत्या खाद्यपदार्थामुळे, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती, अन्न तयार करण्याची प्रक्रिया आणि वापरलेल्या साहित्याची माहिती प्रशासनाकडून पडताळली जात आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा
दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, 10 दिवसांनी आता त्यांच्या पतीचा देखील मृत्यू झाला.
हेही वाचा
Comments are closed.