कबुतरांवरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील राजकारणासाठी उपयोग’; जैन मुनी निलेशचंद्र भडकले

राम कदम यांच्यावर जैन मुनी नीलेशचंद्र : कबुतरraanमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला, असं म्हणणं चुकीचं आहे. कबुतरावरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील उपयोग तुम्ही राजकारणासाठी करत आहात. माझ्या समाजाचे एकमात्र नेते मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाला चूप केलं. पण माझा आवाज तुम्ही बंद करू शकले नाहीत्यामुळे' असं म्हणत राम कदम (Ram Kadam) यांच्या विधानाला जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni Nileshchandra) यांनी चोख प्रत्युत्तर हृदय आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी आज विधानसभेत मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्यावर बोट ठेवत सभागृहात भाष्य केलं. यावेळी बोलताना ‘माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला होता, कबुतरांमुळे होणारे आजार अतिशय घातक आहे. माझ्या आईला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. या आजारावर ठोस औषध उपलब्ध नाही, असं त्यांनी विधान केले होते. यावर आता जैन मुनींनी प्रश्न उपस्थित राम कदम यांचा दावा खोटा असल्याचे सांगितलं आहे.

Jain Muni Nileshchandra : समिती स्थापन करून कबुतरांमुळे मृत्यू होतो की नाही याचा शोध घ्या

कबुतरांवर पंधरा दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं होतं. मात्र आता सहा-सात महिने झाले तरी काहीच झालं नाही. समिती स्थापन करून कबुतरांमुळे मृत्यू होतो की नाही याचा शोध घ्या, असंहे जैन मुनी नीलेशचंद्र विजय हे राम कदम यांना म्हणालेत

Jain Muni Nileshchandra on Ram Kadam: राम कदम हे हिंदुत्वाचे चांगले कार्यकर्ते आहेत. फक्त

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे ते त्यांनी समिती स्थापन करून कबुतरांचा खानपान चालू करावं. कबुतरांना कुठेही घेऊन जा त्याला माझा विरोध नाही. फक्त कबुतरांमुळे राम कदम यांच्या आईचा मृत्यू झाला ही गोष्ट खोटी आहे आणि जर हि गोष्ट सत्य असेल तर समाजासमोर आणा, मी राम कदम यांना विचारेल कबुतरामुळे तुमची आई मेली याचा पुरावा मला द्या. राम कदम ही धार्मिक व्यक्ती आहे, त्यांचे काम चांगले आहे, पण कोणी म्हणतो माझी आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला. तर हे सत्य नाही. प्रत्येकाची आई महान आहे, सभागृहात त्यांनी आईचा मुद्दा मांडायला नको होता. वारंवार मराठी आणि मारवाडी वाद का निर्माण होत आहे. राम कदम हे हिंदुत्वाचे चांगले कार्यकर्ते आहेत. फक्त वारंवार नेते लोक येतात, कबुतरांवर बोलतात. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे. अशी मागणीही जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी यावेळी केलीय.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.