दिग्गजाची वैभव सूर्यवंशीवर टीका! म्हणाले, “या लोकांनी विराटकडून काहीच शिकले नाही…”
भारतीय पुरुष वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. हा दौराही भारतासाठी आयर्लंडप्रमाणे निराशाजनक ठरत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघ मागील पाच सामन्यांपासून पहिल्या विजयाला त्रासला आहे. संघाने आतापर्यंत चार पराभव पाहिले तर एक सामना अनिर्णीत राहिला. तीन वेळेच्या टी २० विश्वचषक विजेत्याच्या या धक्कादायक कामगिरीमागे केवळ कर्णधार, मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजच नाही, तर संघाची फलंदाजी फळीही तेवढीच जबाबदार आहे.
मंगळवारी (७ जुलै) नॉटिंगहॅममध्ये झालेला इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी २० सामना भारताने विक्रमी १२५ धावांनी गमावला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती आणि फिल सॉल्टच्या ७० धावांच्या जोरावर २० षटकांत ७ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ११.४ षटकांत सर्व विकेट्स गमावत ७६ धावाच करू शकला, जी भारताच्या टी २० सामन्यांमधील पाठलाग करताना दुसऱ्या क्रमाकांची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. या मालिकेतून आयपीएल २०२६ गाजवणारा वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले, मात्र तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे.
वैभवने सलामीला येताना पुन्हा एकदा आपली विकेट लवकर गमावली. तो ५ चेंडूंत १३ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने २ षटकार मारले.
वैभवच्या लवकर बाद होण्यावर एक्सवर एकाने वक्तव्य केले आहे. त्याला माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्जने उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “यांनी विराटच्या खेळावरून काहीच शिकले नाही का? धावांचा पाठलाग करताना किंवा धावसंख्या उभारताना तो नेहमी स्वतःला स्थिरावण्याची संधी द्यायचा आणि कधीही घाई करायचा नाही.”
गिब्ज यांनी भारतीय फलंदाजांच्या दृष्टीकोनावर आणखी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, “लक्ष्य मोठे नव्हते. त्यांच्या सर्व फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करण्याचा अजिबात धीर दाखवला नाही. गोल्डन रुल, तुम्ही स्थिरावल्याशिवाय धावा करू शकत नाही.”
या सामन्यात भारताच्या केवळ अभिषेक शर्मा (१०), वैभव (१३), ईशान किशन (१३) आणि अक्षर पटेल (१०) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. अय्यर ५ धावा आणि तिलक वर्मा ३ धावा करत बाद झाले. यावरून भारतीय फलंदाजांनी जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांच्यासमोर पूर्णपणे शरणागती पत्करल्याचे दिसले. आर्चरने तीन तर टंगने चार विकेट्स घेतल्या.
भारताची या सामन्यातील ७६ धावसंख्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील दुसरी सर्वात कमी सर्वबाद धावसंख्या होता. याआधीची सर्वात कमी धावसंख्या २००८ मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ७४ धावांवर सर्वबाद झाला होता.
तसेच भारताचा या सामन्यात १२५ धावांनी पराभव झाला, जो टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील धावांच्या फरकाने झालेला भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी सर्वात मोठा पराभव २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८० धावांनी झाला होता.
Comments are closed.