पावसाळ्यात मुलांना घरातच गुंतवून ठेवतील ‘हे’ मजेदार उपक्रम
पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही. परिणामी त्यांचा वेळ टीव्ही, मोबाईल किंवा टॅबसमोर जास्त जाऊ लागतो. मात्र, थोडं क्रिएटिव्ह माईंड वापरलं तर घरातच मुलांचा वेळ आनंददायी, शैक्षणिक आणि सर्जनशील बनवता येतो. या उपक्रमांमुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी होण्यास मदत होते आणि त्यांची कल्पनाशक्ती, आत्मविश्वास तसेच कुटुंबासोबतचा वेळही वाढतो.
खजिन्याचा शोध
घरातील वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या क्लूज लपवा आणि शेवटी एखादं छोटंसं गिफ्ट किंवा चॉकलेट ठेवा. हा खेळ मुलांना खूप आवडतो आणि त्यांची निरीक्षण क्षमता वाढवतो.
DIY हस्तकला
रंगीत कागद, आईस्क्रीम स्टिक्स, जुने पेपर्स किंवा कार्डबोर्ड वापरून फोटो फ्रेम, पेन स्टँड, कागदी फुलं किंवा पावसाळी थीमवरील हस्तकला तयार करायला सांगा.
मिनी शेफ
सँडविच, फ्रूट सॅलड, स्प्राऊट्स चाट किंवा नो-फायर रेसिपी बनवताना मुलांना सहभागी करून घ्या. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबन आणि अन्नाविषयी उत्सुकता वाढते.
कथा रंगमंच
एखादी गोष्ट निवडा आणि घरातील प्रत्येकाला एक पात्र द्या. छोटासा अभिनय करून गोष्ट सादर करा. यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि संवादकौशल्य विकसित होते.
बोर्ड गेम
लूडो, कॅरम, साप-शिडी, बुद्धिबळ किंवा पझल्ससारखे खेळ संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतात आणि मुलांचा विचार करण्याचा वेग वाढवतात.
विज्ञान प्रयोग
पाणी, रंग, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरसारख्या सुरक्षित वस्तूंचा वापर करून सोपे विज्ञान प्रयोग करा. शिकतानाच प्रात्यक्षिक ज्ञान मिळते आणि स्वतः करत आल्यामुळे आनंदही मिळतो.
म्युझिक टाइम
मुलांची आवडती गाणी लावा आणि त्यांच्यासोबत डान्स करा. हा उपक्रम त्यांचा व्यायामही होतो आणि मूडही छान राहतो.
स्क्रीन वेळ नियम
दिवसभर मोबाईल देण्यापेक्षा खेळ, अभ्यास आणि स क्रिएटिव्ह उपक्रमांनंतर ठराविक वेळच स्क्रीन वापरण्याचा नियम ठेवा. त्यातूनच जर कोणी ऐकत नसेल तर सर्वात कमी स्क्रीन टाइम ज्या मुलाचा झाला असेल त्या बालकासाठी छोटे गिफ्ट किंवा चॉकलेट ठेवा.
Comments are closed.